ॲक्टिव्ह फाउंडेशन अध्यक्ष श्रीकांत लिपाणे यांचे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेला साकडं

आंबेगाव : आंबेगाव परिसरातील नागरिकांसाठी जांभुळवाडी रोड, लिपाणे नगर येथे “लसीकरण केंद्र” सुरू करावे , यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मुख्यआरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना ॲक्टिव्ह फाउंडेशन च्या वतीने अध्यक्ष श्रीकांत लिपाणे यांनी निवेदन दिले.

याविषयी सविस्तर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कोरोनाची दुसरी लाट संपून तिसऱ्या लाटेची सुरुवात होत आहे.दुसऱ्या लाटे दरम्यान संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात होती,जी आजही देणे चालू आहे.परंतु, सद्यस्थितीत आंबेगाव परिसरातील नागरिक आजही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमेपासून वंचित आहेत. 50 हजारच्या पुढे लोकसंख्या असलेल्या भागात प्रभावीपणे आणि नियमित लसीकरण नसल्याने अनेक नागरिक चिंतीत आहेत. या भागातील अपुऱ्या लसीकरण केंद्रामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे.
लोकसंख्येचा विचार करता आंबेगाव परिसरातील नागरिकांसाठी त्वरित लसीकरण केंद्र सुरू करावे.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला होता. अत्ता तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच, अजूनही मुलांच्या पालकांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड ताण – तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांनाचे लसीकरण करून सर्वांना सुरक्षित करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून ॲक्टिव्ह फाउंडेशन ऑफिस (जांभूळवाडी रोड, लिपाणे नगर, आंबेगाव खु.) च्या समोर तात्काळ “लसीकरण केंद्र” चालू करावे.

हे ‘ लसीकरण केंद्र ‘ सुरू करण्यासाठी स्वतःच्या मालकीची मोकळी जागा,पत्र्याचे शेड आणि मंडप टाकून तात्पुरत्या स्वरूपात विनामोबदला महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविली असून
“लसीकरण केंद्र’ तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढणारा संसर्ग थोपविण्यास सहकार्य होणार आहे, असे मत ॲक्टिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष श्रीकांत लिपाणे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.