महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की पवार घराण्याचा उल्लेख हा अनिवार्य ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्यादी आजही लिलया हलवणारा आणि ‘ओल्ड मॅन इन वॉर’ असे संबोधले जाणाऱ्या शरद पवार यांच्याभोवती प्रचंड वलय आहे. मात्र, हे वलय बाजूला असतानाही संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करत महाराष्ट्रातील राजकारणावरती वेगळी अभ्यासू छाप निर्माण करण्यात यश मिळवले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अन् सुप्रिया ताई सुळे यामध्ये वारसदार कोण हा महाराष्ट्रातील चर्चेचा विषय असला तरी पूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावी अशी बहीण- भावाची जोडी लीलया निभवत सुप्रियाताई सुळे यांनी आज महाराष्ट्रातील घराघरात आपल्यासाठी एक विशेष स्थान निर्माण करण्याची कला जोपासली आहे. सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाचा आणि नेतृत्त्वाचा बाज अजित पवार आणि रोहित पवार यांच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा ठरतो.


शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रियाताई सुळे जाणीवपूर्क किंवा कदाचित आणखी कोणत्या कारणाने महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. त्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी आपले लक्ष हे राष्ट्रीय राजकारणावर केंद्रित केल्याचे दिसते. शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांना राजकारणाची आणि समाजकारणाची पूरेपूर जाण आहे. महाराष्ट्रातील राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण करताना कायम 24x 7 राजकारण हा विचार न करता समाजातील असंघटित दुर्बल दुर्लक्षित समाजाच्या मदतीला येत ताई आपल्या हक्काची ही कार्यकर्त्यांनी दिलेली पदवी सुप्रियाताई आपल्या कार्यातून सिद्ध करत असतात.सुप्रियाताई सुळे यांच्याशी संवाद म्हणजे अभ्यासपूर्ण विश्लेषण जिव्हाळा आणि योग्य नियोजनाची शिदोरी ही कार्यकर्त्यांसाठी कायमच प्रेरक ठरत असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत काम करताना सर्वसामान्य माणसाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या विषयी अभिमान वाटावा आणि आणि सर्वसामान्य लोकांना सर्व कार्यकर्ते हे आपले जिव्हाळ्याचे मित्र आहेत आणि या लोकांच्या मदतीवर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो ही भावना निर्माण करण्याची सल्ला कायमच सुप्रियाताई कार्यकर्त्यांना देत असतात त्यामुळेच सुप्रियाताई सुळे या अवघ्या महाराष्ट्राच्या हक्काच्या ताई झाल्या असून सर्वसामान्य माणसांना आपल्या घरातील सदस्य असल्याचाच अभिमान वाटतो.

अधिक वाचा  भारत-अमेरिकेचा अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा निर्धार

सुप्रियाताई यांच्या याच संयमी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर सुप्रिया सुळे संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद झाला असून दिवसेंदिवस दिल्लीच्या राजकारणात अभ्यासू नोंदीसह संभाषण करणारे व्यक्तिमत्व म्हणून सुप्रिया सुळे या नावारूपाला येत असून ही महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांसाठीअभिमानाची गोष्ट आहे.

सुप्रिया सुळे यांचा कार्य प्रवास?

सुप्रिया सुळे यांचा जन्म 3 जून 1969 रोजी झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळख निर्माण

16 व्या लोकसभेत संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार

त्यांनी पाच वर्षांत संसदेत 1176 प्रश्न विचारले होते.

अधिक वाचा  धार्मिक स्थळं 7 ऑक्टो पासून खुली; सरकारकडून नियमावली जाहीर

उत्तम वाकपटू, हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्त्व

राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. त्यामुळेच संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शरद पवारांच्या उत्तराधिकारी?

अनेकदा राजकारणात शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न विचारला जातो. मग हा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. अजित पवार यांनी महाराष्ट्रात आपले स्थान बळकट केले आहे. तर सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण लक्ष राष्ट्रीय राजकारणाकडे आहे. तरीही अधुनमधून सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा घडत असतात.

अधिक वाचा  अटल आरोग्य रथ फुरसुंगीकरांच्या दारी ; प्रत्येकला आरोग्य सुविधा मिळणे काळाची गरज - राहुल शेवाळे

मात्र, शरद पवार यांनीच सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस असल्याचे म्हटले होते. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. तिचा इंट्रेस्ट राष्ट्रीय राजकारणात आहे. संसदेत आहे. उत्तम संसदपटू म्हणून तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले होते.