पुणे : मराठा सेवा संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक पुणे स्टेशन येथे सार्वजनिक ग्रंथालयांना व शाळांना कॉ.गोविंद पानसरे लिखित ‘ राजर्षी शाहू वसा आणि वारसा ‘ याच्या १४६ पुस्तकांचे वाटप सकाळ वृत्तसमूह , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालय ताडीवाला रोड पुणे स्टेशन , कार्तिकेय सामाजिक संस्था संचालित “”मिनाद ग्रंथालय”” भाग्योदय नगर कोंढवा खुर्द पुणे. , कै.जडावबाई नारायणदास दुगड विद्यालय
मिठानगर कोंढवा खुर्द पुणे ,आयडियल एज्युकेशन सोसायटी
सय्यदनगर हडपसर पुणे , श्री संभाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,हडपसर ,पुणे वाचनालयाचे नाव छत्रपती संभाजी सार्वजनिक मोफत वाचनालय , काळेपडळ , हडपसर पुणे यांना मा अजित निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा  निवडणुकीच्या तोंडावर धनगरांच्या पदरी पुन्हा ‘निराशा’; धनगर आणि धनगड वेगवेगळे, ‘सुप्रीम’चा मोठा निर्णय

यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर , शिवश्री राजेंद्र कुंजीर , पुणे मनपा चे रणजित मुटकुळे , शिवश्री महेश घाडगे, शिवश्री मारुती सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत केला गेला.यावेळी बोलताना मा अजित निंबाळकर म्हणाले ” राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून सारथी संस्था महाराष्ट्र राज्याने स्थापन केली. शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते तर आधुनिक समाजाच्या विकासाचे शिल्पकार होते. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली.शिक्षणासाठी मुलांना न पाठवणाऱ्या पालकांना दंड करणारा पहिला राजा. आज आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहे पण १९०२ सारी केवळ समाज व्यवस्था लक्षात घेऊन आरक्षण देणारे राजे हे राजर्षी शाहू महाराज होय.”

अधिक वाचा  यूपीएससीचा १८० IAS, २०० IPS आणि ३७ IfS पदे अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

या कार्यक्रमाला आबा जगताप, राकेश भिलारे,अन्वर शेख, गणेश माथवड , सुजित यादव ,शोएब इनामदार, देवदास लोणकर, साईनाथ भंडगे, सुनिल भालके सर , मल्लिनाथ गुरवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर यांनी केले व सूत्रसंचालन आणि आभार शिवश्री महेश टेळेपाटिल यांनी मानले.