मराठी भाषा दिन आणि गर्जा महाराष्ट्र माझा अशा विविध मराठी अभिमानाच्या घोषणा आपण देत असलो तरी दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली आपण अनेक बदल आपल्या आयुष्यात कडून घेतले असले तरी मराठी भाषा आणि परंपरा जगविण्यासाठी त्यांना योग्य न्याय देण्याची गरज लक्षात घेऊन बावधन भागातील कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडेपाटील यांच्या मराठी दिनदर्शिकेची निर्मिती केली असून मुंबईमध्ये नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

मराठी भाषा जतन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मराठी भाषेचा दैनंदिन वापर वाढविण्याची गरज असतानाही आपण जागतिकीकरणाच्या नावाने दैनंदिन वापरामध्ये मराठी दुर्लक्षित करत असून ही समाजासाठी धोक्याची घंटाच आहे भागातील मनसैनिक राजेंद्र वेडे पाटील यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात होण्याची गरज आहे असे मत प्रकाशनावेळी राज साहेब ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर संघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, सुरेश करांजवणे, दिनेश वेडेपाटील आणि स्वप्नील रमेश वेडेपाटील उपस्थित होते.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?