करोना वैश्विक महामारीच्या काळात लहान मुलांना घराबाहेर पडणं सोपं नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत, “स्वारद फाऊंडेशन”, पुणे यांच्या कडून ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा बरोबरच गड किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या ” सह्याद्री प्रतिष्ठान” च्या मावळ्यांचा सत्कार संस्थापिका सौ.स्वातीवहिनी शरद मोहोळ आणि परमपूज्य गुरूवर्य श्री ॐकालीचरण महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

-स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

चित्रकला स्पर्धा —

लहान गट
प्रथम क्रमांक–प्रणव प्रदिप मिसाळ
द्वितीय क्रमांक– अनुज राहूल वांजळे
तृतीय क्रमांक–अनवी बोराडे

अधिक वाचा  निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड

चित्रकला स्पर्धा–

मोठा गट
प्रथम क्रमांक–सेजल बळीराम धारसे
द्वितीय क्रमांक– तनिषा फाळके
तृतीय क्रमांक–प्रतिक ज्ञानेश्वर गाऊडसे

वक्तृत्व स्पर्धा —
प्रथम क्रमांक–शंतनू संजय उभे
द्वितीय क्रमांक– स्वराली श्रीकांत वासकर
तृतीय क्रमांक–अनुष्का हर्षद मोरे