नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा प्रतिष्ठान व भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त आज पुणे मनपा प्रभाग क्र.10 बावधन ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये 83 वर्षांचे (डॉ.सौभाग्य गुप्ता) ज्येष्ठांपासून ते 4 (नेत्रा जोशी) वर्षांच्या चिमुकलीने सहभाग नोंदविला. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत दोन गटांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरामध्ये योगसाधनेचे महत्व व माहितीही नागरीकांना सांगण्यात आले.

सदर शिबिरा प्रसंगी भारतीय योग संस्थान च्या मा. आशा कराळे, डॉ.सचिन नागपूरकर, डॉ.सीमा पाटील, डॉ.सौभाग्य गुप्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बावधन नगरचे कार्यवाह मा.संजयजी पैठणकर, बावधन हास्य क्लबच्या अध्यक्षा मा.नीलिमा कलावंत, सागर कडू, बंडू भंडारी, कैलास माझिरे, सुप्रिया माझिरे, पिनाक भारद्वाज, दिलीप पुराणिक, इंदु गुप्ता, शैलेश वेडेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  निवडणुकीआधीच भाजपने उधळला गुलाल; 5 उमेदवार बिनविरोध 197 अर्ज त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट