जागतिक योग दिनानिमित्त स्वा.सावरकर मैदान हाॅल,उजवी भुसारी काॅलनी येथे योग शिबिराचे आयोजन नगरसेविका सौ.अल्पना वरपे व भाजपा युवामोर्चाचे प्रदेश चिटणीस अॅड गणेश वरपे तसेच भाजपा प्रभाग क्र १० च्या वतीने करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक सौ.मंजिरीजी कंटक(योग शिक्षिका,योग विद्या गुरुकुल) यांनी जीवनातील योगसाधने चे महत्व व माहिती सांगीतली व योगासने करून घेतली.

यावेळी योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षिका सौ.मंजिरी कंटक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, कोथरूड महिला मोर्चा पदाधिकारी सौ.गायत्रीताई काळभोर, सुप्रिया माझिरे, सौ.विद्या टेमकर, भाजपा प्रभाग, मतदारसंघ पदाधिकारी राजेश मनगिरे, गणेश लोखंडे, कृष्णा भंडारी, सिद्धेश कवडे, अभिजीत धुमाळ,शुभम शेवाळे,संतोष महाजन,राजीव निगडीकर,नितीन भुंडेपाटील,अमोल शिर्के,ओंकार शिंदे आदि.पदाधिकारी तसेच मान्यवरांमध्ये मा.सिताराम तोंडेपाटील, अॅड.उमेश दिवाणे,ललित सावंत,कैलास माझिरे,आश्विन भूमकर,रूद्र क्षिरसागर,विनोद कोकरे,दुर्गेश भोसले,सुरेश गोडांबे,पार्सेकर काका, गणेश पंडीत, घनश्याम पाटील, राजने सर, सौ.शिल्पाताई कवडे,सौ.होराणे ताई आदि नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले

सदर कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत वैभव मुरकुटे यांनी केले व समारोप सागर कडू यांनी केला.