भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसा दिनी मुकुल फाउंडेशन व कोकणवासीय धनगर समाज सेवा संघ पुणे शहर यांच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून प्रभाग क्रमांक 13 मधील गरजू रिक्षावाले काकांना धान्याचे किट व 62 विधवा महिला यांना साड्या देण्यात आल्या यावेळी प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस राज्याची पांडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक दीपक पोटे, मतदार संघाचे अध्यक्ष पुणे जोशी, महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे, पुणे सरचिटणीस अनिता तलाठी, मतदार संघाच्या शुभांगी जोशी, रमा डांगे, राजूभाई तांबोळी, अनुताई एडके, रितेश वैद्य, श्रीधर मोहोळ, सौरभ मुकेश, अनिवसे प्रभाग क्रमांक 13 चे अध्यक्ष राजू वेडे शंतनु खिलारे चंद्रकांत पवार सिद्धार्थ भोंडे वैभव जमदाडे शेखर जोशी जनार्दन शिरसागर सौरभ अथणीकर संतोष लांडे कुणाल तोंडे गणेश थरकुडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  वसंत मोरे यांचा यॉर्कर; प्रकाश आंबेडकरांना घालणार साकडे, वंचितच्या तिकीटावर लढणार?

कोकणवासीय धनगर समाजसेवेचे शाम जंगले, संतोष कोलापटे, संदीप अनिवासे, दिलीप शेळके, प्रसाद शेळके, बाळासाहेब कोळापटे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केले होते. मुकुल माधव फाउंडेशन चे योगेश रोकडे जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन शंतनु खिल्लारे यांनी केले व आभार प्रदर्शन शाम जंगले यांनी केले. यावेळी एकशे 50 रिक्षावाले काकांना रेशनिंग किट देण्यात आले.