पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB) रचलेल्या सापळ्यात अडकल्या आहे. विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा विधाटे यांना 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. थेट महापालिकेतील त्यांच्या दालनातच त्या पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्या आहेत. महत्वाचं म्हणजे 15 दिवसांनी त्या निवृत्त होणार होत्या. तक्रारकर्ता विकास हस्तांतरण अधिकाराच्या मंजुरीसाठी विधी विभागाकडे आला होता.

यावेळी त्याची मंजुरी देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी मंजुषा यांच्याकडून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर मंजुषा इधाटे यांच्या दालनातच पैसे घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  ना आलिशान फ्लॅट अन् बंगला; काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट?