पुणे शहराप्रमाणेच आपल्या जांभूळवाडी कात्रज परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक विचाराने प्रेरित झालेल्या श्रीकांत मारुती लिपाणे यांनी 2009 मध्ये आपल्या वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीचा व सामाजिक स्वरूपात पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन आंबेगाव पठार परिसरामध्ये लिपाणेवस्ती शनीनगर चौक या भागातून ॲक्टिव फाउंडेशन च्या मार्फत सामाजिक सेवेला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये समाजसेवा करत असताना अनेक कठीण प्रसंग आले तरी कोणत्याही कठीण प्रसंगात न  थांबता श्रीकांतजी नी आपल्या समाजसेवेचा वसा कायम सक्रिय ठेवत या परिसरामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून आज घराघरांमध्ये घरातील प्रत्येकासाठी या ब्रीद वाक्याप्रमाणे य़ा संस्थेच्या मार्फत सामाजिक कार्य सुरू असूनयामध्ये शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम रस्ते, योग्य शैक्षणिक सुविधा, युवकांच्या समस्या अन महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून ॲक्टिव फाउंडेशन च्या माध्यमातून काम केले जात आहे.

जांभुळवाडी परिसर तसा सुरुवातीला शेतीप्रधान भाग म्हणून पुणे शहरात त्याची ओळख होती. जाभुळवाडी तलावाच्या पाण्यावर याभागातील शेती व्यवसाय सुरु होता परंतु वाढते शहरीकरण आणि नागरिकरणाची वाढती मागणी यामुळे या भागात नागरी वस्ती वाढत चालली आहे. ग्रामपंचायत काळापासून आज पुणे महापालिकेत समावेश झाल्यापर्यंत प्रशासकीय पातळीवर मात्र या भागाला कायम दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली. यातूनच ॲक्टिव फाउंडेशनच्या मार्फत समाज कार्याला आणि विविध समस्यांना वाचा फोडण्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. बांधकाम व्यावसायिक घराण्याची पार्श्वभूमी असतानाही श्रीकांत लिपणे यांनी सामाजिक कार्याला आपले आयुष्य अर्पित करून समाजाच्या सर्व हाल-अपेष्टा दूर करण्यासाठी आपले आयुष्य व्यतित करण्याचा संकल्प केला आहे. वडील मारुती लिपाणे हे 1997 ते 2007 दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य निवडून येत होते परंतु वडील राजकीय क्षेत्रात असताना ग्रुप ग्रामपंचायती च्या प्रशासकीय रचनेनुसार दुर्लक्ष कायमच आंबेगाव पठार जांभुळवाडी परिसर दुर्लक्षित राहिल्याने या भागातील सोयी-सुविधा आजही अत्यंत तोकड्या असून या सर्व समस्यांना न्याय देण्यासाठी फाउंडेशन च्या मार्फत श्रीकांत लिपाने काम करत आहेत.

वसा समाजसेवेचा अन उदिष्ठ लोकसेवेचे…..

वडिलांच्या मार्फत लहानपणापासूनच घरामध्ये सामाजिक कार्याचा वसा असल्याने बालपणातच समाजाप्रती असलेली आपुलकी बळावत गेली आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या उद्देशाने समाजासाठी काहीतरी करण्याच्या उदात्त हेतूने एखादी संस्था निर्माण करण्याचा विचार मनात आला आणि 2009 मध्ये ऍक्टिव्ह फाउंडेशन ची फाऊंडेशनचे मुहूर्त मेढ लावण्यात आली. घराला राजकीय वारसा लाभलेला असतानाही केवळ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राजकारणामुळे आपल्या भागातील सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अत्यंत त्रास होत असल्याच्या कारणास्तव एक सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने 2009मध्ये कार्याला सुरुवात केली. कात्रज जांभूळवाडी परिसरात नागरीकरण वाढत असताना या भागातील समस्या अत्यंत जटिल होत आहेत. नागरिकांना हक्काचे पाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी श्रीकांत लिपाणे यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली.

जांभळवाडी तलावाच्या लगतचा हा नागरी वस्तीचा भाग असला तरी आजही या भागातील लोकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नित्याने कसरत करावी लागत आहे. त्याबरोबरच नागरी आरोग्याच्या समस्या ही गंभीर होत आहेत पुणे महापालिकेच्या वतीने या भागाचा समावेश महापालिकेच्या अंतर्गत करण्यात आला असला तरी आरोग्य आणि सामाजिक गरजेच्या वस्तूंची आजही वानवा आहे.  याभागातील लोकांना माफक दरामध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या हेतूने श्रीकांत लिपाणे यांनी या भागांमध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी प्रि प्रायमरी स्कूल ची स्थापना करून बाल वयामध्ये योग्य संस्कार मुलांवर घडवून उज्वल भविष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच समाजातील अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या व होतकरू बुद्धिमत्ता बाळगणाऱ्या लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी जयभवानी पतसंस्था स्थापन करून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचे कार्यही सुरू ठेवले आहे.

श्रीकांत लिपाणे यांची धडपड आणि समाजाप्रती असलेली निष्ठा व अर्पित कार्य करण्याची भूमिका लक्षात घेऊन नामदार विजयबापू शिवतारे यांनी भक्कम पाठबळ देत या नव्या नेतृत्वाला पैलू पाडण्याचे काम केले आहे. कात्रज जांभूळवाडी परिसर पुणे शहरालगत असला तरीही या भागाचा समावेश पुरंदर विधानसभा मतदारसंघात करण्यात आल्याने याभागाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होईल की काय या भीतीने नागरिक धास्तावलेले असताना श्रीकांत लिपाणे यांनी नामदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव परिसरामध्ये सामाजिक कार्य आणि प्रशासकीय कामाच्या माध्यमातून या भागातील सर्व सोयी सुविधा देण्यासाठी सर्वांगीण काम करण्याचे ठरवले आहे.

अधिक वाचा  गुंड संदीप मोहोळ खून; तिघांना जन्मठेप तर 12 जणांची निर्दोष 

समाजकार्याच्या रथाची घोड दौड सुरूच…..

श्रीकांत लिपणे यांनी अटी फाउंडेशनच्या मार्फत सुरू केलेल्या समाजकार्याच्या रक्ताची घोडदौड करोनाच्या काळामध्ये सुरू असून परिसरातील नागरिकांना धान्यवाट्प  रिक्षाचालकांना शिधावाटप, नागरिकांची आरोग्य तपासणी, या महत्त्वाच्या घटकांकडे पहा लक्ष देत आपल्या परिसराला या जागतिक संकटातून दूर ठेवण्याचे काम केले आहे. नागरी आरोग्यसाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या तुटवड्याबाबत जाणीव असल्याने सलग 12 वर्षापासून वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर घेऊन एक सामाजिक भावना आणि नागरिकांना सतत आरोग्यविषयक मदती काढण्याच्या मार्फत कार्य सुरू आहे. जांभुळवाडी परिसरातील लोकांना या भागात राहण्यास आल्यापासून सर्व सुविधा मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या श्रीकांत लिपाणे यांना या भागातील मुलांची भविष्य अंधारमय होण्याची वाटत होती ; त्यामुळेच त्यांनी स्वतः माफक शुल्कामध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्वतःची शैक्षणिक संस्था सुरु करून सामान्य नागरिकांच्या चिंता दूर केले आहेत. कोणतेही कार्य व सामाजिक काम करताना कधीही पुरस्कार मिळेल याची आशा न ठेवता अविरत काम सुरू आहे.

जांभूळवाडी तलावावरती गणेश उत्सव या काळात थेट  तलावांमध्ये श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले जात होते; परंतु यामध्ये मूर्तींची विटंबना आणि तलावातील प्रदूषण या दोन्ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या होत्या. उन्हाळ्यामध्ये तलावातील पाणी कमी झाल्यानंतर उघड्या पडणा-या गणपतीच्या मूर्ती आणि निर्माल्यातून परिसरात होणारी दुर्गंधी या समस्यांचे निवारण करण्यासाठी फाउंडेशन च्या मार्फत नियोजन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळामध्ये तलावात लगेच विसर्जन करण्यास आलेल्या नागरिकांसाठी श्री ची आरती आरती व्यवस्था करण्यासाठी कट्टे आणि निर्मल यासाठी निर्माल्य कलश फाउंडेशन च्या मार्फत ठेवण्यात आले.

यामुळे तलावालगत गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना आपल्या मूर्तीची विटंबना नव्हता योग्य पद्धतीने श्रींचे पाण्यामध्ये विसर्जन करणे शक्य होत आहे. शक्ती फाउंडेशन च्या कामाची पद्धत लक्षात घेऊन फक्त जांभुळवाडी परिसरात होती असलेले विसर्जन घाट याची ख्याती हळूहळू आंबेगाव कात्रज धनकवडी आणि कात्रज कात्रज तलावा लगतच्या लोकांनाही समजल्याने दिवसेंदिवस या भागांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरिक अत्यंत निष्ठेने येत असून या परिसरातील व्यवस्था भाविकांना जिव्हाळ्याची वाटत आहे.

भाविकांना श्री चे विसर्जन विधी करण्यासाठी सोयीसुविधा दिल्यानंतर तो साध्य करण्यासाठी श्रीकांत लिंबाने यांनी भाविकांना मृत्यू देण्यासाठी प्रबोधन करण्यास सुरुवात केली आज या कार्याला बारा वर्षांची तपपूर्ती झाल्यानंतर उत्तम प्रतिसादाने मूर्तीदान यशस्वी झाले असून आज या भागातून किमान 15000 मुर्त्यांचे मूर्तिकारांना परत दान केले जात आहे.

सामाजिक विकास साध्य करण्यासाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज लक्षात घेऊन फाउंडेशन च्या मार्फत संस्थेच्या ब्रीद वाक्य प्रमाणे प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट लक्षात ठेवून या परिसरातील महिला व मुलांना एकत्र आणण्यासाठी नवरात्र उत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्याचा शुभारंभ करण्यात आला. नवरात्र उत्सवाचे काळात परिसरातील महिला एकत्र येतात आणि आपल्या विचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक ऐक्य निर्माण झाले आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीमध्ये होत असल्याने परिसरात आपुलकीची भावना निर्माण झाली त्यामुळे परिसरातील समस्यांना आणि त्या सोडविण्यासाठी लोकसहभाग हा आपोआप मिळत गेला.

दीपावली सणाच्या निमित्ताने सांस्कृतिकपणाची ओळख टिकवण्यासाठी परिसराचे वैभव असलेल्या जांभूळवाडी तलावावरती दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ही नागरिकांना आपला उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास एक अनोखी संधी मिळाली आणि संगीत मैफली मुळे एक प्रसन्नता निर्माण होऊन एक सांस्कृतिक वारसा परिसरामध्ये जोपासत आहे.

सौभाग्याचे लेणे हे प्रत्येक महिलांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याने या महिलांच्या सर्वोच्च सणाचे ही नियोजन करण्याचा संकल्प फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. परंतु यामध्येही राष्ट्रसेवा आणि देशभावना जोपासण्याच्या उद्देशाने गेली बारा वर्षापासून 26 जानेवारीला हळदी कुंकवाचे नियोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या आयुष्यपट उलगडून सांगण्यासाठी विविध माहितीपट व ध्वनिफीत यांच्यामार्फत विचार पोचविण्याचे काम केले जात आहे.

विकास वेल अंकुरली…..

समाजकार्याची भावना मनामध्ये जोपासत असताना 2009 चा  फाउंडेशनचा जन्म झाला निवडक तरुणांनी सुरू केलेली संघटना हा नावलौकिक मिळाला होता; परंतु परिसराचा विकास हे उद्दिष्ट असल्याने या परिसरातील सामाजिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवरात्र काम करण्याचा संकल्प या तरुणांनी केल्याने संस्थेची विकास होईल हळूहळू अंकुरित होण्यास सुरुवात झाली. जांभुळवाडी परिसरात गणेश विसर्जन व्यवस्था महिलांसाठी हळदी कुंकाचे नियोजन दिवाळी पहाट नवरात्र उत्सव अशा विविधांगी सामाजिक कार्यातून एक्टिव फाऊंडेशनच्या कार्याचा नावलौकिक परिसरामध्ये होऊ लागला.

अधिक वाचा  पुरबाधित घरांबाबत उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा... 

जांभुळवाडी परिसरातील सर्व नागरिकांना फाऊंडेशन ही संस्था आपल्या घरातील वाटत असताना घरातील प्रत्येक माणूस या संस्थेमार्फत कार्य करण्यासाठी तत्परतेने मदतीच्या भावनेने समोर येत होता याच काळामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार विजय बापू शिवतारे यांनी श्रीकांत लिपाने यांच्यातील नेतृत्वगुणांचा आढावा घेत या तरुण नेतृत्वाला बळ देण्याचे काम केले जांभुळवाडी परिसरातील प्रशासकीय अडचणीवर मात करण्यासाठी श्रीकांत लिपाने यांनीही नामदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरुवात केली.

जांभुळवाडी परिसरातील मुख्य रस्ता वर्षानुवर्षे रखडल्याने या भागातील नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागत होता यावर मात करण्यासाठी श्रीकांत लिपाने यांनी आमदार विजय शिवतारे यांच्याकडे या मुख्य रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला; या कामाला यश आल्याने महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता तयार झाला. नामदार विजय बापू शिवतारे यांनी या चार किलोमीटरचा रस्ता शनिनगर चौक ते जांभुळवाडी कोळेवाडी सिमेंटीकरण करण्यासाठी 7.5 कोटी ची तरतूद केल्याने या परिसरातील लोकांना वर्षानुवर्ष होणार या त्रासातून मुक्तता मिळाली आहे.

पाणी हे जीवन ही भावना लहानपणापासूनच मनात बळावत असताना दिवसेंदिवस वाढते नागरीकरण आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिसरात सर्वांना अभिमान असलेल्या जांभुळवाडी तलावाची दुरवस्था मनाला खूप वेदना देत होती. या तलावाच्या शुद्धीकरणासाठी आणि नियोजन बद्दल संवर्धनासाठी योजना करण्याचा विचार एकटी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. या विचारावर नामदार विजय बापू शिवतारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जांभुळवाडी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 13 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून यापैकी साडेचार कोटी निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत तलावाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक व खुली व्यायाम शाळा करण्यात येणार आहे; परंतु सद्यस्थितीत कोरोना संक्रमणामुळे या परिसरातील काम सध्या संथ सुरू आहे.

नैसर्गिक रचनेनुसार जांभुळवाडी कोळेवाडी चा परिसर हा डोंगर उतारा लगत असलेल्या अनेक प्रशासकीय सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत होत्या; यामुळेच या भागातील ड्रेनेज व्यवस्था आणि पाणीपुरवठा योजना ही कायमच लोकांना तोकडी पडत होती. या परिसरातील वाढते लोकसंख्या लक्षात घेऊन यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असतानाच पाच लाख लिटर ची पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करून त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. काही दिवसातच परिसरातील या पाण्याच्या टाकीतून नियोजित पाणीपुरवठा करण्यात येईल त्यानंतर नागरिकांना पाणी समस्या असून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्याही परिसराचा विकास होत असताना अन्न पाणी निवारा या मुख्य समस्या निवारण केल्यानंतरच परिसराला एक योग्य साचेबंद विकासाची दिशा मिळत असते. जांभुळवाडी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडून जाणारा मुख्य रस्ता शुद्ध पाण्याचे नियोजन नामदार विजय बापू शिवतारे यांच्यामार्फत केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला. असला तरीही या परिसरातील मुख्य समस्या म्हणजे पूर्वी पासूनच ड्रेनेज व्यवस्था मोडकळीस आली होती त्यातच या भागात नागरीकरण वाढत असल्याने या परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था पूर्ववत करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या मलनिस्सारण व्यवस्था यामुळे आजही दूषित पाणी जांभुळवाडी तलावाच्या अंतर्गत जात असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ॲक्टिव्ह फाउंडेशन च्या वतीने कार्य केले जात आहे. आजही पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाठपुरावा करून जांभळवाडी परिसरातील मलवाहिनी ड्रेनेज व्यवस्था व्यापक आणि सुव्यवस्थित करण्याचा पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांना नित्याच्या आवश्यक असलेल्या पोलिस ठाणे महसूल विभाग पुणे महापालिका विभाग या विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी भटकावे लागत आहे त्यातच ही सर्व कामे एकमेकांशी संलग्न असल्याने अनेक दिवस वाया जाण्याचे प्रमाणही जास्त आहे.

सर्वसामान्य नागरिकांना कायमसाठी ससेहोलपट करावी लागते यावर मात करण्यासाठी फाउंडेशन च्या मार्फत बहुउद्देशीय सेवा सुविधा केंद्र उभारण्याचा मानस असून एकाच इमारतीमध्ये या सर्व सुविधा देण्याची अनोखी संकल्पना जांभुळवाडी परिसरात उभी राहणार आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी भाजीमंडई व दवाखाने अध्याहृत असणे आवश्यक असते यामुळेच या परिसरातील सर्वांगीण विकास करताना मी त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टीही याच परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशन काम करत आहे जांभुळवाडी परिसरात नागरिकांना उद्याने क्रीडांगणे चा उपभोग घेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून जांभुळवाडी परिसरात लगतच आणि तलावाच्या आजूबाजूला खुली व्यायाम शाळे सह उद्दान निर्मितीचाही संकल्प करण्यात आला आहे.

अधिक वाचा  बोम्मईंचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री; महाराष्ट्रासह पिता पुत्रांच्या 10 राज्यात जोडी

कोणत्याही घराचा कणा ही त्या घरातील महिला असते घरातील पुरुष मंडळी मी त्याच्या कामाला गेल्यानंतर महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक महिला विविध प्रकारच्या कला कौशल्य जोपासत कार्य करत असतात. यामध्ये कौटुंबिक वापरासाठी लागणाऱ्या वस्तू बनवणे शिवणकाम विविध प्रकारचे उत्पादन करणे या मार्फत कार्य केले जात असले; तरी त्यासाठी योग्य बाजारपेठ नसल्याने महिलांना कायमच शहरातील विविध भागांमध्ये आपण तयार केलेल्या उत्पादनांना ग्राहक शोधण्याचे काम करावे लागते.

पुणे शहरातील असंख्य भागात महिलांना प्रशिक्षण देऊन वेगवेगळी उत्पादने तयार करण्यासाठी सक्षम बनविण्याचे काम केले जात असताना या कामाची ही विकास होईल. जांभुळवाडी परिसरामध्ये अंकुरत करण्यासाठी ॲक्टिव्ह फाउंडेशन काम करत असून महिलांसाठी खास बाजारपेठ तयार करण्याचा मानस करण्यात आला आहे. महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने कात्रज उद्यान विविध प्रकारचे मॉल दुकाने या मध्ये हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा असण्याचाही संकल्प फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेला आहे.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून अशी ओळख असली तरी प्राथमिक शिक्षणासाठी मध्यमवर्गीय नागरिकांना दिवसेंदिवस कष्ट सहन करावे लागत असून शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक पिळवणुकीला अनेक नागरिक बळी पडत आहेत यावर मात करण्यासाठी प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूलभूत पाया लक्षात घेऊन एक टी फाउंडेशन च्या वतीने प्री प्रायमरी स्कूल च्या मार्फत या पिळवणुकीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजना केली असून परिसरातील नागरिकांना माफक दरामध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.

आरोग्य शी आयुष्यात निगडीत गोष्ट असून लहान मुलांच्या आरोग्यात काळजी घेण्याच्या उद्देशाने शासकीय स्तरावर अनेक योजना असतानाही याचा लाभ असंख्य नागरिकांना मिळत नव्हता याचा फायदा उठवत परिसरातील अनेक खाजगी दवाखाने सामान्य नागरिकांची लूट करत असताना या अत्यंत जिव्हाळ्याच्या नर्सिंग साठी ऍक्टिवा फाउंडेशन च्या मार्फत एक अनोखा संकल्प करण्यात आला असून शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सर्व लसीचे वितरण करून पात्र व्यक्तीला लसीकरण मोहीम चा लाभ घेण्यासाठी काम केले जात आहे

विकासाचा शुभारंभ अंतर्गत रस्ते विकासातूनच…..

कोणत्याही परिसराचा विकास होत असताना मुख्य रस्ते सुविधा देण्यात आल्या तरी सामान्य नागरीक रहिवास करत असलेल्या वस्ती आणि सोसायट्यांमध्ये जर सोयी-सुविधा पोहोचले नाही तर सर्वसामान्य नागरिकांना कायमच त्रास सहन करावा लागत असतो म्हणूनच घरातील प्रत्येकासाठी या ब्रीद अपरा वाक्याप्रमाणे एकटी फाउंडेशनच्या मार्फत जांभळेवाडी परिसरातील हनुमान नगर , शनिनगर लिपान वस्ती, काका पवार तालीम कुस्ती संकुल  सिद्धिविनायक सोसायटी,  सप्तगिरी सोसायटी, बालाजी ग्रीन पार्क सोसायटी भागांमध्ये अंतर्गत सिमेंटकरण्याचे काम करण्यात आले आहे. याबरोबरच  साई मंदिर सच्चाईमाता नगर अंतर्गत रस्ते, दुगड स्कूल, अटल एक ते अकरा रस्त्याच्या सिमेंटकरण्याची कामे पाठपुरावा करून नामदार विजय बापू शिवतारे यांच्या विकास निधीतून करण्यात आलेली आहेत.

जांभुळवाडी परिसराचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आल्यानंतर या परिसरातील विकास कामांना खंड न पडण्यासाठी पुणे महापालिकेच्या विविध योजना या भागात मिळवण्यासाठी श्रीकांत लिपणे येथे कार्यरत असून त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे सुरुवातीला ग्रामपंचायत त्यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि आत्ता पुणे महानगरपालिका अशा तीन स्तरावर ते परिसरातील नागरिकांचा विकास करण्यासाठी काम करण्याचा संकल्पच फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्याने कोणत्याही राजकीय परिस्थितीत हार न मानता फक्त काम पूर्णत्वास नेण्याचा संस्थेचा मानस या परिसराचा दिवसेंदिवस कायापालट करत असून या नेतृत्वाला योग्य संधीची गरज आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मार्फत जांभुळवाडी परिसरातील लेक व्हिस्टा गेट ते तलावापर्यंत सिमेंटीकरण करण्यात आले असून शनी नगर चौक ते ब्लू वे वॉटर स्पोर्टस डांबरीकरण ही केले आहे याबरोबरच दरी पूल ते लेक शायर सोसायटी डांबरीकरण व गगनगिरी हिल्स राधाकृष्ण सोसायटी वाघजाई नगर डांबरीकरण पूर्ण करून विकास वेल अंकुर ठेवण्याचे काम केले जात आहे. गेली बारा वर्षापासून जांभुळवाडी परिसरात श्रीकांत लिपाने हे ऍक्टिव्ह फाउंडेशन च्या मार्फत काम करत असून या नव्या नेतृत्वाला लोकांच्या मदतीची आवश्यकता असून पुणे महानगरपालिकेत मध्ये जर नेतृत्वाला संधी मिळाली तर परिसराचा कायापालट होण्यास मदतच होणार आहे.