महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचं सर्वांत मोठं श्रेय, निश्चितपणे स्वर्गीय चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेबांकडे जाते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृततेचा विचार आपल्याला दिला. तोच संस्कार पक्षाने अंगीकारला आहे. संकटांना संपूर्ण ताकदीनं सामोरं जाणं. संकटं कितीही आली आणि ती कितीही मोठी असली, तरी हार न मानता, खचून न जाता त्या संकटांशी संपूर्ण ताकदीनं लढणं. संकटांशी दोन हात करत लढण्याची जिद्द आणि शिकवण आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थेट कृतीतूनच दिली आहे.

साहेबांनी सातत्यानं महाराष्ट्राचा सन्मान कायम ठेवण्याचं, वाढविण्याचं काम केलं. ‘महाराष्ट्र कुणासमोर झुकला नाही आणि झुकणार नाही…’ हा संदेश संबंधितांपर्यंत वेळोवेळी पोहचवण्यात साहेब कायमच यशस्वी ठरले आहेत. ‘महाराष्ट्र कोणासमोर झुकणार नाही’ या ‘इतिहासा’चं साहेब हे, ‘वर्तमान’ आहेत. तोच विचार पक्षाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगात भिनला आहे.

अधिक वाचा  राज्यातील आज 'या' मंडळात एकही मृत्यू नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आस्था, आपुलकी, प्रेम बाळगणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार. धन्यवाद!