संविधानाचा आदर, लोकशाही संकेतांची जपणूक, उपेक्षित, वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्धता, सहकाराचे सूत्र अवलंबत गरीब शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या हिताचे समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा मुख्य गाभा राहिला आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करणं ही सध्या आपली प्राथमिकता आहे. त्याचवेळी कोरोनापश्चात राज्याची विस्कटलेली आर्थिक, सामाजिक घडी पुन्हा बसविण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे. या कामात महाराष्ट्रासह देशाच्या नवनिर्माणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा नक्कीच उचलेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आस्था, आपुलकी, प्रेम बाळगणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार. धन्यवाद!

अधिक वाचा  मीराबाईची डोपिंग चाचणी; घरी जाऊन रक्‍तातील तसेच सॅम्पल ब नमुनेही होणार