पुणे दि.8 : अनुसूचित जाती, नवबौध्द मुलांची शासकीय निवासीशाळा पेठ, ता.आंबेगाव, जि. पुणे येथे 2021-22 साठी सेमी इंग्रजी व मराठीमाध्यमासाठी इयत्ता 6 वी 10 वी मधील रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.

प्रवेश अर्ज सकाळी 10 ते 5 या वेळेतशाळेमध्ये विनामुल्य उपलब्ध होतील. शाळेमध्ये अनुभवी व तज्ञ शिक्षक, मोफत भोजन वनिवासाची सोय, स्वच्छ वातावरण व 3 मजली इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षामार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय,24 तास वीजव पाणी तसेच 3 हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय व वाचनालय आदी सुविधा उपलब्ध आहेत.

अधिक वाचा  ‘गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात’, संजय राऊत यांचा महायुतीवर निशाणा

प्रवेशासाठी अनुसूचित जाती 80 टक्के,अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागासप्रवर्ग 2 टक्के तर अपंगांसाठी 3 टक्के याप्रमाणे जागा आरक्षित राहतील.

अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिकाश्रीमती व्ही.बी. खाडे, मोबाईल क्रमांक 8999042428 किंवा गृहपाल श्रीमती एस.एस.कुलकर्णी, मोबाईल क्रमांक 9423013063 येथे संपर्क साधावा, असे शाळेच्यामुख्याध्यापिका व्ही.बी. खाडे यांनी कळविले आहे.