पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्यातील रूग्णसंख्या तीन महिन्यात प्रथमच पाचशेच्या खाली आली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्याही साडे सहा हजारांपर्यंत घसरली आहे.

विशेष म्हणजे क्रिटिकल रूग्णसंख्या देखील महिन्याभरानंतर हजाराच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासात मृतांची संख्याही 30 पेक्षा कमी आहे. पुण्यात दिवसभरात 486 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून दिवसभरात 887 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील रुग्णांचा आकडा 9 इतका आहे. सध्या पुण्यात 954 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहे.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन मोरया मित्र मंडळाचा वेगळा स्तुत्य उपक्रम

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९७४७.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६६१५.

– एकूण मृत्यू -८२३२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४९००.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२३

दुसरीकडे मुंबईत गेल्या 24 तासात 1066 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 22 इतका आहे. पुण्यापेक्षा मुंबईत मृतांचा आकडा कमी असल्याचं दिसत आहे.

देशात मृतांचा आकडाही कमी

कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 7 दिवसात सरासरी मृतांचा आकडा पाहिल्यास तो 18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 16 मे रोजी 4 हजार 40 रुग्णांचा मृत्यू कोरोनानं झाला होता. मात्र सध्या ही संख्या 3 हजार 324 च्या वर आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांचा आकडा सध्या 3 हजारच्या खाली येत नाही आहे. शनिवारी 3 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला.