पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने आज क्र ३२ वारजे माळवाडी मधील बारा बलुतेदार समाजापैकी चर्मकार , नाभिक , सुतार , पोतराज , गारूडी , तृतीयपंथीय , वारकरी संप्रदाय , ड्रायव्हर , अंध -अपंग , मोलमजुरी करणारे भगिनी आदि १५० गरजू कुटूंबियास किमान १५ दिवस पुरेल इतका कोरडा शिधा किटचे वाटप खडकवासल्याचे आमदार भिमरावआण्णा तापकीर यांचे शुभहस्ते करण्यात आले .

या किटमध्ये ५ किलो गहू आटा , ३ किलो तांदुळ , १ किलो तुरडाळ , १ किलो साखर , १ किलो बेसन , २५० ग्रॅम चहापावडर , जिरे , मोहरी , मिरची पावडर प्रत्येकी १०० ग्रॅम , बिस्कीट पुडे २ , १ किलो मीठ , २ कपड्याचे साबण , २ अंगाचे साबण या साहित्याचा सामावेश होता .

अधिक वाचा  सराईत गुन्हेगार कोयतागँग म्होरक्याचा कोयत्यानेच अंत; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; टोळीयुद्धातून थरारक खून

या कार्यक्रमास आमदार भिमरावआण्णा तापकीर यांचे समवेत मा. आनंद रिठे अध्यक्ष शहर सुधारणा समिती पुणे मनपा , खडकवासला अध्यक्ष मा.सचिन मोरे , किर्तनकार धर्मराज महाराज हांडे , किरण बारटक्के सचिव पुणे शहर , रिक्षा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले , एनजीओ आघाडीचे अध्यक्ष डॅा. अजय दुधाने, ह.भ.प सतीशमामा बोडके , अजित देशपांडे सरचिटणीस सहकार आघाडी, यांचे सह रेश्मा पाटणकर, ऋषिकेश रजावात , अमजद अन्सारी , व्यंकटेश दांगट , किरण साबळे , रेणुका मोरे , वर्षा पवार , यांचेसह लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते .