पुणे महानगरपालिकेच्या कोणत्याही कामासाठी अगोदर ठेकेदार ठरवून नंतर निविदा भरण्याची पद्धत सत्ताधारी भाजप पक्षाकडून राबवली जात असून मोठ्या कंपन्याच्या दावणीला पुणे महानगरपालिकेला बांधण्याचा प्रयत्न केला जात असून पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून आळा घालण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी अजित पवार यांच्या बैठकीत उपस्थित राहून केली आहे. पुणेकर पुन्हा सत्ता देणार नाहीत याची खात्री झाली असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून 5 ते 7 वर्षाचे टेंडर कालावधी घेण्यास अट्टहास करत आहेत असा दबक्या आवाजात वरीष्ठ अधिकारी चर्चा करत आहेत.

कोरोनाची परिस्थिती बघता लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असताना लस खरेदीसाठी राज्य शासनाकडे बोट दाखविणारे भाजपचे सताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले. मुंबई महानगरपालिकेने लसीचे टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३) (क) चा वापर करून लस खरेदी करावी अशी मागणी आम्ही पुणे महापालिकेकडे केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत असताना अशा गंभीर विषयांवर नियोजन करणे सोडून पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून खालील टेंडर प्रक्रिया प्रशासनावर दबाव आणून भाजपचे सत्ताधारी एकहाती सतेचे ऋण फेडत आहेत.

अधिक वाचा  गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा

१. निविदा क्र. १४/२०२१ पुणे महानगरपालिका अंतर्गत ड्रेनेज लाईन साफसफाई ४ नग १२ के एल क्षमतेचे सक्शन कम जेटिंग रिसायकलर मशिनच्या सहायाने सात वर्षाच्या कालावधी करिता करणे हे टेंडर मागविण्यात आले असून एकाच वेळी सात वर्षाचा कालावधीसाठी निविदा मागविली आहे.

महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन मधील गाळ काढायचे काम वर्षोनुवर्षे होत असून यावर्षी ७ वर्षाच्या कालावधीसाठी ३४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पुणे महानगरपालिकेत पडला आहे

२. सुरक्षा विभागाने ३० कोटी रकमेचे टेंडर काढले असून यातून सुरक्षा रक्षक पुरविणे हे काम होणार आहे या टेंडरच्या अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. अद्याप मनपा मिळकती कधी उघडणार याची शाश्वती नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड

३. महापालिकेस उत्पन्न मिळावे या हेतूने रस्ते खोदाईस परवानगी दयायची आणि परवानगीचे ठिकाण सोडून शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर केबल्स टाकायच्या असा प्रकार चालू आहे.

४. पुणे शहरातील नदीतील जलपर्णी काढणेबाबत टेंडर प्रक्रिया राबविली असून हे काम विशिष्ट ठेकेदारास मिळावे या हेतूनेच बनविले आहे अशा कारभारामुळे निकोप स्पर्धा होत नाही.

५. पुणे महापालिकेचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर काढले असून हा प्रकार म्हणजे ठेकेदाराठीच काम करायचे भाजपने ठरवले आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना मागील एक वर्षापासून वाहनतळ सुरळीत चालू नसताना असे टैंडर काढले आहे. पूर्वी एक एक वाहनतळाचे टेंडर काढले जायचे अचानक हा बदल का केला यावर कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही, हे काम भाजपशी जवळीक असलेला ठेकेदारच घेईल यात शंका नाही अशा विविध टेंडरच्या माध्यमातून पुणेकरांच्या कररूपी पैशाची धुळदान उडविली जात असून कोरोनाच्या काळात गोंधळ घालू नंतर आपली सता नाही आपण कशासही उत्तरदायित्व नाही अश्या भावनेने पुणे महापालिकेत गैरव्यवहार चालू आहेत याचा फायदा प्रशासनातील काही अधिकारी उचलत असून काही अधिकारी खाजगीत बोलत आहेत मार्च २०२० पासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे.

अधिक वाचा  सध्या ‘मोबलींचीग’चे रोहित पवार आणि युगेंद्र पवार बळी अन् जीवालाही धोका; पोलीस सुरक्षा द्या: सुळेंची मागणी

कोरोनावर होणारा खर्च पाहता महापालिकेकडून वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. असे असताना महापालिकेचे लूट थांबणे सोडाच पुढील अनेक वर्षामध्ये मनपा तिजोरीत कसा खडखडाट होईल याचे नियोजन लॉक डाउन काळात चालू आहे. उपरोक्त नमूद बाबी पाहता महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता या पत्राच्या अनुषंगाने सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना करावेत.