स्वातंत्रवीर सावरकर मित्र मंडळ व मनसे शाखा एरंडवणे च्या वतीने राम बोरकर मित्र परिवार आयोजित सातत्यपूर्ण रक्तदान व प्लाझ्मादान कार्यक्रम पुण्यात बहुदा पहील्यांदाच सलग ३२ दिवस चालु असलेल्या कार्यक्रमास कोरोनाच्या या संकटात कडक ऊन्हाळा असतानाही उदंड प्रतिसाद मिळाला ९२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले ११६ जणांनी प्लाझ्मा दान करून आपला सहभाग नोंदविला. एकून २२० कोरोणा ग्रस्त रूग्णांना प्लाझ्मा मिळवून देऊन रूग्णांना बरे होण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न केला.

समाजाकडून आपल्याला काय मदत मिळेल यापेक्षा समाजाला आपण काय मदत देऊ शकतो या प्रमाणेच स्व शिरिष तुपे यांच्या २८ व्या स्रूतीदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातुन पुण्यात रक्ताचा तुटवडा भासल्यामुळे पुणे शहरात नजिकच्या काळात या कार्यक्रमातुन इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठीकाणी एवढ्या मोठ्रयां संखेने रक्ताच्या पिशव्यांचे प्रथमच संकलन झाले आहे. ९२० रक्तदात्यांस कोरोणा यौध्दा म्हणून गौरविण्यात आले. ३२ दिवसांच्या दरम्यान पुणे शहर व जिल्ह्यातील कोविड रूग्णांना बरे होण्यासाठी याचा मोठा फायदा झालेला आहे. या पुढेही कोणत्याही रूग्णांस कोठेही कधीही रक्ताची व प्लाझ्माची गरज भासल्यास अगदी हक्काने संपर्क करावा असे आवाहन राम बोरकर ९८५०४३३१५० यांनी केलेले आहे. ३२ दिवस सातत्याने झालेल्या कार्यक्रमात रक्त व प्लाझ्मा संकलनाचे काम अक्षय ब्लड बँक आणि पी एस आय ब्लड बँक यांनी रक्त संकलनाचे काम पाहीले.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

रक्तदान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश सागवेकर. म न पा अधिकारी, जयंत देवरे, नागेश जगताप, राजु सातपुते, राजेंद्र मोरे, रोहीत सातपुते, चंदन सागवेकर, प्रदीप ठोंबरे  कीरन शिंदे, दत्ता बिरादार, प्रथमेश सागवेकर, धीरज पवार ,प्रकाश कुडले, अशोक ठोंबरे, निलेश शेलार, कुंदन सागवेकर इत्यादींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला. सलग ३२ दिवस यशस्वीपणे कार्यक्रम राबविला म्हणून एरंडवण्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने नगरसेवक जयंत भावे, उमेश कंधारे, शिवाजी शेळके, अमोल डांगे, क्षिरसागर, अण्णा गोसावी आदींनी आयोजक राम बोरकर यांचा विशेष सन्मान केला.

यावेळी राम बोरकर म्हणाले, संकटाच्या कालावधीमध्ये रक्तदानाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक मदत करता आली तसेच गेले बत्तीस दिवस नागरिकांनी दररोज रक्तदान करून एक वेगळा विक्रम रचला आहे.