पुणे वन विभाग अंतर्गत इंदापूर वनपरिक्षेत्रात वन परिमंडळ जंक्शन, नियत क्षेत्र कळस, मौजे काझड फॉरेस्ट गट नं ३४५ व कळस फॉरेस्ट गट नं ४० लगत कळस-काझड शिवेवर बोरी फिरंगाई मंदिर रस्त्यावर दि.१८/०५/२०२१ रोजी रात्रौ.१० वा. नियमित गस्ती दरम्यान क्षेत्रीय कर्मचारी यांना वन क्षेत्रात टॉर्च चा प्रकाश दिसल्याने व संशय बळावल्याने सिनेस्टाईल पाठलाग केला असता आरोपी महेश जंगलू मने, वय ४० रा.सणसर ता. इंदापूर, जि.पुणे व दत्तात्रय पोपट पवार वय ४२ रा.बोरी, ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडे गोनीमध्ये चिंकारा जातीचे रक्ताने माखलेले नर हरीण मृत दिसून आले. आरोपींची झडती घेतली असता त्यांचे जवळ एक ९ बोअर ची रायफल ६ जिवंत काडतुस व १ वापरलेले काडतूस पुंगळी तसेच युनिकॉर्न कंपनीची मोटासायकल क्र. एम एच ४२ एव्ही २१११ आढळून आली. वरील दोन्ही आरोपींना चिंकारा शिकार प्रकरणी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) (ड) (१) व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६),९,११ व ५१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

अधिक वाचा  संजय काकडेंची पोस्ट; 100 नगरसेवकांचीही न्यारी गोष्ट चंद्रकांतदादांचा स्व-अनुभव पुण्याची उमेदवारी धोक्यात?

सदर कारवाई राहूल पाटील, भा. व.से. उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली आशुतोष शेंडगे, सहाय्यक वन संरक्षक, पुणे  राहुल काळे, वन परिक्षेत्र अधिकारी, इंदापूर अशोक नरुटे वनपाल जंक्शन, श्रीमती पूजा काटे वनरक्षक कळस यांनी केली. तसेच स्थानिक ग्रामस्थ अतुल नरुटे, विनोद नरुटे, संदीप नरुटे यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढील तपास राहुल काळे वन परिक्षेत्र अधिकारी इंदापूर करत आहेत.

वन विभागाने आरोपीविरुध्द वेळीच कारवाई करुन गुन्हा नोंद करुन आरोपींना ताब्यात घेतल्याने वन्यजीव संरक्षण व संवर्धन होवून शिकारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. आपले परिसरात कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे जवळचे कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांना तात्काळ देण्यात यावी तसेच हॅलो फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे