नवी दिल्लीः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ICMR आणि AIIMS यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यात आलीय. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्यात. कोविड 19 वरील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वतीनं एक बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीला अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीतच प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि बर्‍याचदा हे अयोग्य पद्धतीने वापरले गेलेय.

प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक

अधिक वाचा  नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची नवी खेळी, मोठ्या उमेदवाराची करणार घोषणा ?

ICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.

तर प्लाझ्मा थेरपीच्या “ऑफ लेबल” वापरास परवानगी देण्यात

यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या “ऑफ लेबल” वापरास परवानगी देण्यात आली होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?

प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग

प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

खरं तर प्लाझ्मा थेरपीमध्ये, कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात उपस्थित अँटीबॉडीज गंभीर रुग्णांना दिली जातात. वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते, 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेतल्यानंतर असे आढळून आले की, यामुळे रुग्णांच्या मृत्यू आणि रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही.