मुंबई : टाइम्स समूहाची मालकी असलेल्या बेनेट, कोलमन अँड कंपनीच्या अध्यक्ष इंदू जैन यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. दातृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन कलासक्त होत्या. महिला अधिकाराच्या समर्थनार्थ त्यांनी कार्य केले होते.

पती अशोक जैन यांच्या निधनानंतर इंदू जैन यांनी टाइम्स समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. सामाजिक विकास आणि परिवर्तनासाठी त्यांनी टाइम्स फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली होती. महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यातही जैन यांचे मोलाचे योगदान आहे. फिक्कीच्या छत्राखाली स्थापन झालेल्या महिला उद्योजिकांच्या संघटनेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.

ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करणाऱ्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले होते. शासनाने त्यांना २०१६ मध्ये पद्माभूषण पुरस्कार प्रदान केला. युनायटेड नेशन्सच्या २००० साली झालेल्या ‘मिलेनियम वर्ल्ड पीस समीट’ मध्ये त्यांनी विचार व्यक्त केले होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कामगिरी! एनडीएच्या प्रचारासाठी प्रचाराला गेले अन् थेट दोन आमदारच पक्षात घेऊन आले!