हडपसर : पुण्यातील एका युवा पत्रकाराचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप जगदाळे (45) असे निधन झालेल्या युवा पत्रकाराचे नाव आहे. जगदाळे हे हडपसर परिसरात बातमीदारी करत होते. सुमारे 20 दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज (गुरूवार) त्यांचे निधन झाले आहे.

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर परिसरात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते धडाडीने कर्तव्य बजावित होते. अलिकडील काळातच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मागिल दहा दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी काही वेळापुर्वी समोर आली आहे. युवा पत्रकार जगदाळे यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे. संदीप जगदाळे यांना न्युजममेकर परिवराकडून भावपुर्ण श्रध्दांजली.

अधिक वाचा  गैरविश्वास दाखवला तर ‘हे’ लक्षात ठेवा, पक्षप्रवेशाच्याच दिवशी मोहिते पाटलांचा आढळरावांना मोठा इशारा

हडपसरमधील युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना मागिल 24 दिवसांपासून हडपसरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मागिल दहा दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली, आज (गुरुवार, दि. 13 मे 2021) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रयत शिक्षण संस्थेच्या साधना कन्या विद्यालयामधील शिक्षिका सारिका संदीप जगदाळे यांच्या त्या पत्नी होत. संदीप जगदाळे (मूर्ती, ता. बारामती) शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी शिक्षण घेऊन पुण्यामध्ये नोकरी करत असताना पत्रकारितेचा अभ्यासक्रम केला. त्यांनी पत्रकारितेमध्ये विपुल लेखन केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होते. संदीपच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि हडपसरमधील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.