अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित १६ मे हा दिवस जागितक कृषी पर्यटन दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही कृषी आणि पर्यटन विषयातील तज्ञ, अभ्यासू मान्यवरांचे अनुभव या परिसंवादात एेकायला मिळणार आहे. कृषी, संस्कृती आणि पर्यटन या विषयासंबंधी अॅग्रो टुरिझम विश्व प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद सहली, संशोधन अहवाल प्रसिद्ध करत असते. कृषी पर्यटनाविषयी प्रचार व प्रसार करते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याचे काम अॅग्रो टुरिझम विश्व करत आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रकारचे पर्यटन केले जाते. या पर्यटनातील संधी, गरज आणि भविष्य या विषयावर हा परिसंवाद असणार आहे.
या परिसंवादामध्ये पर्यटन क्षेत्रातील शासनाची भूमिका – सौ. सुप्रिया करमरकर, उपसंचालिका, पुणे, पर्यटन संचालनालय, भारतातील कृषी पर्यटनाचे भविष्य – चंदन भडसावळे, जागतिक व भारतीय पर्यटनाचे वेगळेपण – प्रज्ञेश मोळक, कृषी पर्यटन आणि पर्यायवरणाचे महत्व – बसवंत बाबाराव विठ्ठाबाई, पर्यटन व डिजिटल मार्केटिंग – व्यंकटेश्वर कल्याणकर, कोरोनानंतरच्या पर्यटनासाठी उपाययोजना – दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे, जबाबदार पर्यटन – चंद्रशेखर जयस्वाल, उप महाव्यवस्थापक, महाराष्ट्र, दिल्लीत कृषी पर्यटन – लक्ष्य डबास, कृषी पर्यटनातील संधी – गणेश चप्पलवार इ. मान्यवर या परिसंवादमध्ये सहभाग होणार आहेत.

झूम या आँनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून परिसंवादाचे फायदे कृषी पर्यटन केंद्र चालक, कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणारे, पर्यटनातील विद्यार्थी, अभ्यासक आणि आवड असणार्‍या सगळ्यांना होईल. जास्तीत जास्त सहभागी व्हा तसेच अधिक माहितीसाठी अॅग्रो टुरिझम विश्व च्या फेसबुकला भेट द्या असे आवाहना अॅग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक गणेश चप्पलवार यांनी केले आहे.

खालील लिंकला 8 ते 16 मे दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता भेट देऊन परिसंवाद मध्ये सहभाग होवू शकता. Join Zoom Meetinghttps://us04web.zoom.us/j/2609508015?pwd=ZGtYdkhvTGpUY1ljd2pBTHc2dzAyQT09

कुठे : झुम, दिनांंक : ८ ते १६ मे 2021
वेळ : दररोज संध्याकाळी 7 ते 7:30
अधिक माहितीसाठी संपर्क 9730023946