पुणे : मुळशी तालुक्यातील खारवडे गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हसोबा देवस्थान ट्रस्ट श्री म्हसोबा देवाची यात्रा दर वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ह्या दिवशी भरवण्यात येते परंतु गेली दोन वर्ष जगावर करोणाचे सावट असल्यामुळे हि यात्रा साध्या पद्धतीने करण्यात येत आहे.. सदरची यात्रा ह्या वर्षी करोणाचे सर्व नियम पाळून ट्रस्टच्या चार ते पाच विश्वस्त आणि दोन चार ग्रामस्थ यांनी मिळून देवाची पूजा करून साध्या पद्धतीने यात्रा केली.

दरवर्षी या यात्रेला वीस ते पंचवीस हजार भाविक येतात पहाटे पाच वाजल्यापासून हा सोहळा चालू होतो त्यामध्ये देवाला आंघोळ घालून रुद्राभिषेक केला जातो, होम हवन, तालुक्यात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार, पुरस्कार वितरण ,प्रवचन, संध्याकाळी चार वाजता ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळा, स्तिर वादन आणि सायंकाळी सात वाजता छबिना नऊ वाजता आकर्षक बक्षीस देऊन ढोल लेझीम स्पर्धा आणि रात्री तमाशा लोकनाट्य कला अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केले जातात.

अधिक वाचा  तुरुंगातून सरकार चालवणे शक्य आहे का? राज्यपालांचा स्पष्ट नकार; दिल्लीत आता काय होणार?

ह्या वर्षी फक्त देवाची पूजा करण्यात आली आणि देव दरवर्षी पालखीतून घेऊन येतात परंतु ह्या वर्षी यात्रा रद्द झाल्यामुळे जास्त माणसं जमू नये म्हणून  पालखी सोहळा रद्द करून देव पालखी ऐवजी परतीमध्ये ठेवून साध्या पद्धतीने  कुठलेही वादन न करता घेऊन आले या वर्षी फक्त धार्मिक कार्यक्रम करून मास लावून सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी कमी करून यात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा मुकुंद भेलके , विश्वस्त वसंतदादा मारणे, दिनेश जोगावडे, संभाजी गावडे, लक्ष्मण शेडगे , ज्ञानेश्वर मारणे, मुकुंद भेलके, केदार मारणे, शंकर मारणे उपस्थित होते.