नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटून आणि दिल्ली डेअरडेविल्सचा प्रमुख खेळाडू आर.अश्विन पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचडर्सन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले तसंच अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोनाच्या कारणास्तव मायदेशी परतण्याची शक्यता आहे. याच आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन प्लेअर तथा मुंबईच्या संघातील बिनीचा शिलेदार नॅथन कुल्टर नाईल भडकलेला पाहायला मिळाला. ‘तुम्ही भारताचं आयपीएल मैदान सोडून जाऊ नका. जरी कोरोनाची लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत’, अशा शब्दात त्याने आयपीएलचं मैदान सोडून जाणाऱ्या खेळाडूंना चपराक लगावली.

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच

कुल्टर नाईल नेमकं काय म्हणाला?

“सध्या घरी जाण्यापेक्षा आपण भारतात सुरक्षित आहोत. आयपीएल स्पर्धा सोडून जाण्यापेक्षा आपण बायो बबलमध्ये अधिक सुरक्षित आहोत. जरी भारतात कोरोनाची दुसरी लाट असेल तरी आपण बायो बबलमध्ये असल्याने आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी घरी जाण्यापेक्षा आपण भारतातच थांबायला हवं”, असं नॅथन कुल्टर नाईल म्हणाला. तो क्रिकेट डॉम कॉम डॉट एयू या वेबसाईटशी बोलत होता.

भारत सोडून जावं की नाही जावं, यासंबंधी अनेकांची अनेक मतं असू शकतात. मी जेव्हा मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या अँड्यू टायशी बोललो तेव्हा मी त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. खरं तर हा ज्याच्या त्याच्या निर्णय आहे, पण मला जर विचाराल तर मी सांगेन की आम्ही सर्व खेळाडू बायो बबलमध्ये सुरक्षित आहोत, त्यामुळे कोरोनाची आम्हाला तेवढी भीती नाही, असंही तो म्हणाला.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

“माझं काही दिवसांपूर्वी अॅडम झॅप्माशी बोलणं झालं. मायदेशी (ऑस्ट्रेलिया) जाण्यावरुन माझ्या आणि झॅम्पामध्ये बराच काळ चर्चा झाली. मी त्याला सांगितलं सध्याच्या काळात घरी जाण्यापेक्षा मी आयपीएलच्या निमित्ताने असलेल्या बायो बबलमध्ये मी अधिक सुरक्षित आहे, तू ही विचार करावा”, असंही कुल्टर नाईलने सांगितलं.

आयपीएल स्पर्धेतून आतापर्यंत किती खेळाडुंनी माघार घेतली?

IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अ‍ॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.

बायो बबलमुळे खेळाडुंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम?

दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.

अधिक वाचा  निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड

इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.