हडपसर : लस उत्पादित करणाऱ्या अग्रगण्य कंपनीमध्ये असणारी आणि संपूर्ण जगाला कोविड-19 ची लस देणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आहे. कंपनीच्या सन 2021 ते सन 2024 साठी कामगार प्रतिनिधी निवडणूक नुकतीच संपन्न झाली.सलग 12 वष॔ अखंडित वच॔स्व प्रस्थापित करणारे कामगार नेते सचिन गोपीनाथ तुपे आणि अजित खैरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला.

सिरम एम्प्लॉईज युनियन आणि परिवर्तन पॅनल यामध्ये समोरासमोर लढत होऊन सिरम एम्प्लॉईज युनियनच्या सर्वांच्या सव॔ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष प्रविण घुले, उपाध्यक्ष गिरीश मोरे, सचिव सचिन तुपे, खजिनदार राजेश कांबळे, कामगार प्रतिनिधी अजित भिंताडे, सचिन गायकवाड आणि अतुल कदम यांची निवड करण्यात आली.

अधिक वाचा  मोहिते पाटलांचंही ठरलं पुण्यात शरद पवारांची भेट; रविवारी होणार प्रवेश; धैर्यशील मोहिते 16 ला अर्ज भरणार

सिरम् कंपनीतील माजी कामगार प्रतिनिधी श्री दशरथ दिनकर कटके श्री राजू ऊंद्रे व राॅयल सेल्वनायगम तसेच असंख्य कामगारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.