कर्वेनगर व लगतच्या परिसरातील लोकसंख्या 1.50 लाखाच्या आसपास असून सुद्धा कर्वेनगर मध्ये एक अद्यावत लसीकरण केंद्र नाही. प्रभाग क्र 31 सर्व्हे नंबर 9 मधील वेंदात नगरीजवळील 100 फुटी डी.पी.रोड लगत 4 एकर जागेमध्ये पुणे महानगरपालिके मार्फत नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या सहयादी निधीमधून पुणे शहरातील सर्वात मोठी ई-लर्निंग स्कुल विकसित करण्यात आली आहे. या स्कुलचे काम पूर्ण झाले असून कोरोना स्थितीमुळे याचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

या स्कुल मध्ये 19 अद्ययावत रूम्स, तीन स्टेअरकेस (जिना), 2 मोठे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम, सात ते आठ रूम करिता अटॅच बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था तसेच पाणी, लाईटची पूर्ण सोय, पार्किंग करिता अंदाजे 25 हजार स्के.फूट जागा आपण उपलब्ध केली आहेत. तरी या सर्व सोई-सुविधांयुक्त असलेल्या स्कुलची पुणे मनपा प्रशासनाने पाहणी करून कोरोना लसीकरण आणि अत्यावश्यक सुविधा स्कुलचे उद्घाटन होईपर्यंत चालू करावे, याबाबत आपण मनपा आयुक्तांना प्रत्यक्ष भेटुन मागणी केली आहे. प्रशासनातील संबंधित अधिकारी वर्गाने त्वरित जागेची पाहणी सुद्धा केली आहे.

अधिक वाचा  महायुती-मविआसाठी ‘या’ जागा डोकेदुखी का ठरल्यात?घराणेशाही, राजकीय जातीय समीकरणे अजूनही गुंताचं!

सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह अवस्थेकडे चालली आहे. राज्य सरकारने नुकत्याच कोरोनाशी लढण्यासाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. पुणे शहरात निर्मित झालेली कोरोनाची लस ही आमच्यासाठी अभिमानस्पद बाब आहे. कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही लस जास्तीत जास्त लोकांना मिळणे ही सध्याची मुख्य गरज आहे.

जर याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाले तर कर्वेनगर भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविता येतील आणि नागरिकांची गैरसोयही होणार नाही. पुणे मनपा आयुक्त याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.