पुणे शहरात दिवसभरात ३ हजार २८६ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील आजपर्यंतची एकूण बाधितांची संख्या २ लाख ४७ हजार ६२९ झाली आहे, तर ५ हजार १३७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज दिवसभरात १ हजार २०० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी देखील सोडण्यात आले. आजअखेर २ लाख १३ हजार ९१४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती दिली असून लॉकडाउनसंबंधीही भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

“मोठ्या प्रमाणात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री नात्याने उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलावालं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर