पुणे: वारजे बदलतेय…… वारजे विकासाचे शिल्पकार आपला हक्काचा माणूस अशा अनेक मनमोहक पंक्तितून या भागातील लोक प्रतिनिधी बदललेल्या वारजे ची जाहिरात करत असले तरी या भागातील सलग दोन वर्ष जलमय होणारे रस्ते आणि रोजची वाहतूक कोंडी ही समस्या वारजेकरांना कायम भेडसावत असून याकडे मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने या भागातील नागरिकांना या समस्या नित्याच्या होत आहेत. वारजे भागांमधून जाणाऱ्या नाल्यावरून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चा महामार्ग जात असून या मार्गामुळे या भागातील नैसर्गिक नाला चार ठिकाणी बाधित झाला आहे; परंतु या या भागातील रस्त्यांची कामे करताना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग मार्फत योग्य खबरदारी घेतली नसल्याने वारजे भागात आदित्य गार्डन सिटी, साई सयाजी नगर, अतुल नगर, पॉप्युलर नगर, राजयोग सोसायटी आणि वारजे गावठाणसह माई मंगेशकर समोर नाल्यावर पुल बांधताना पुणे महापालिकेच्या विकास आराखड्याचा विचार न कल्या या कामामध्ये नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी झाली झाली असून याबाबत वेळीच जागृत राहण्याची गरज आहे.

अधिक वाचा  नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, तर पराभव करणार; बच्चू कडू यांचा कडाडून विरोध

वारजे भागात वाढत चाललेले नाल्यावरील अतिक्रमण डोंगरउतारावर होत असलेली निवासी वस्ती यामुळे पर्जन्यवृष्टीचे पाणी सल भागामध्ये अत्यंत वेगाने येत असल्याचे निदर्शनास येत आहे. वारजे विकसित आणि सहा पदरी रस्ते करताना या नाल्याच्या रुंदीचा आणि खोलीचा विचार न केल्याने या भागातील मुख्य हमरस्त्यावरून आणि सेवा रस्त्यावरून पावसाच्या पाण्याची लोट दिसत असून मुख्य चौकात किमान 5 ते 6 फूट पाण्याची पातळी वाढत आहे. नाल्याला आलेली भरती आणि रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे दिवसेंदिवस कायमच पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षापासून माई मंगेशकर हॉस्पिटल समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व्यक्तीने नव्याने नाल्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी दोन वर्षापासून रस्त्यावर पाणी येण्याच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल झालेला नाही यामागचे कारण म्हणजे नाल्याची रुंदी नकाशाप्रमाणे अधिकृत न धरता सोईप्रमाणे केल्याने या भागातील पाण्याला रस्त्यावर येऊनच नदीपर्यंतचा जावे लागत आहे.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला

वारजे भागातील नाल्याची कामे करताना सर्विस रस्तालगत आणि रस्त्यांच्या खाली नाल्याची रुंदी (प्रायमो अहवालानुसार) ४.२० मीटर करण्याची गरज असताना आर एम डी सिंहगड कॉलेज माई मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर काम करत असताना चहा या नाल्याची रुंदी कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा रस्त्यावरून पाण्याचे लोट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माई मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर सध्या सुरू असलेल्या कामात पुलाचे (R.C.C.) काम मूळ नाल्यामध्ये १ ते २ फुट नाल्यात आले आहे. या भागात पाण्याचा प्रवाह आणि नाल्याला असलेली कमी अंतरावरती जास्तीची वळणे या मुळे पुन्हा रस्त्यावर पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे.