मुंबई : इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात इन्कम टॅक्स विभागाला मोठा पुरावा सापडला आहे. कोट्यवधींची हेराफेरी झाल्याचं आयटीला समजलं आहे. तब्बल 650 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे पुरावे IT विभागाच्या हाती लागले आहेत. 3 मार्चला IT विभागाने 2 फिल्म प्रोडक्शन कंपनी, दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी, अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावरही धाड टाकली. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबादमध्ये घर आणि ऑफिस अशा एकूण 28 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यादरम्यान या प्रोडक्शन हाऊसच्या इन्कम आणि शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पुरावे सापडले आहेत.

अधिक वाचा  लातूरच्या विकासासाठी ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू…’ देशमुख

तब्बल 650 कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याची दिसून आलंं आहे. 350 रुपयांबाबत कंपनी काहीही माहिती देऊ शकली नाही. तापसी पन्नूच्या नावानं 5 कोटी रुपयांची कॅश रिसीटही सापडली आहे, ज्याचा तपास सुरू आहे. याशिवाय आणि 20 कोटींबाबतही पुरावे सापडले आहेत. फँटम आणि क्वान या दोन्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत मोठ्या रकमेचा ई-मेल, व्हॉट्सप चॅट्स असा डिजीटल डेटा हार्ड डिस्क स्वरूपात सिझ करण्यात आला आहे. अद्यापही तपास सुरू आहे.

‘फँटम फिल्म’आणि ‘क्वान’ या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.