कोरोना मुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकुण ४३ लोकांनीी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला, प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन पर्यावरण पुरक असा संदेश देण्यात आला. विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन हर्षद खाडे आणि श्रीयश राऊत यांनी पार पाडले.

मिनाताई ठाकरे नगर गणपती मंदिरात येथे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन या सोसायटीतील स्थानिक रहिवासी श्री रविंद्र बाईत यांच्या हस्ते झाले.

अधिक वाचा  निवडणुकीच्या तोंडावर धनगरांच्या पदरी पुन्हा ‘निराशा’; धनगर आणि धनगड वेगवेगळे, ‘सुप्रीम’चा मोठा निर्णय

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री राजेंद्र (बाबु) वागसकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री किशोर शिंदे, श्री हेमंत संभुस, शहराध्यक्ष श्री अजय शिंदे, उपशहर अध्यक्ष श्री राम बोरकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया,विभाग अध्यक्ष सुधीर धावडे,सुरेखा ताई होले, कसबा विभाग अध्यक्ष आशिष देवधर, विभाग सचिव राजेंद्र वेडेपाटील, उपविभाग अध्यक्ष सचिन विप्र, शैलेश जोशी, रमेश उभे, नितीन गायकवाड, दत्ता पायगुडे, संग्राम तळेकर प्रभाग अध्यक्ष गणेश शेडगे, शाखा अध्यक्ष अशोक कदम,विजय पालकर, आनंद पाटील, महेश देवळेकर, सुशांत भुजबळ, योगेश वाव्हळ, रोजगार स्वयंरोजगार चे संघटक किरण जोशी, संतोष चव्हाण, महाराष्ट्र सैनिक हर्षल कुलकर्णी, दिनेश खेडेकर, धनंजय पांडे शंकर हिंगे, शशीकांत घोडके, कुणाल काटवे हर्षद खाडे आणि श्रीयश राऊत उपस्थित होते. विद्यार्थी सेने तर्फ शशांक अमराळे, रौनक कारेकर आणि आकाश बोबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.