पुणे (महेश टेळेपाटील): “स्पा सेंटर सुरू ठेवायचे असल्यास प्रतिमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यायचा” नाहीतर दंडुकधारी माणसे पाठवून मारहाणीची धमकी देणाऱ्या पोलीस प्रवाह न्यूजच्या एका पत्रकारासह तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

विशाल कचरू पायाळ (वय २८, रा. कदम वाकवस्ती, लोणी काळभोर), सनी तानाजी ताकपेरे (वय २७, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल पायाळ हा पोलीस प्रवाह न्यूजचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. त्याचा साथीदार पंकेश राजू जाधव यालाही अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगेश हे. कोरेगाव पार्कमधील स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. स्पा सेंटरच्या मालकीन नूतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या असून १६ जानेवारी रोजी त्यांच्या स्पामध्ये दोघे जण आले व त्यांनी स्काइन स्पा चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, तेव्हा धवन यांनीत्याला नकार दिला. त्याने माझे परवानगीशिवाय स्पा चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा १५ हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल अशी धमकी देत माणसे पांठवून मारण्याचीही धमकी दिली. सोमवारी त्याने फोन करून आज दुपारी पैसे घेण्यासाठी

अधिक वाचा  महायुतीत ८ जागांवर तिढा, भाजप नेतृत्वाला डोकेदुखी; पूनम महाजनांची उमेदवारीही येथे रखडली?

याप्रकरणी मंगेश डोंगरखोस (वय येतो, असे सांगितले. या प्रकाराची त्यांनी ३१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी कोरेगाव पार्क पोलीसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी तातडीने इतर अधिकारी,पंचाना बोलावून स्टाइन स्पा येथे सापळा रचला, विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले. मंगेश यांच्याकडून 15 हजार रुपयांचा हप्ता घेताना रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, रुपेश चाळके, दिनेश शिंदे, अमोल सोनवणे, राजेश पवार, निशिकांत सावंत, संदीप गर्जे, गणेश गायकवाड, तुकाराम शिंदे, सचिन वाघमारे, प्रकाश लंगे यांच्या पथकाने केली आहे.