पुण्यातील रिक्षा संघटनेच्या  पदाधिका-यांनी नवनियुक्त परिवहन आयुक्त मुंबई अविनाश ढाकणे यांच्याबरोबर RTO च्या संबंधित अनेक समस्यावर खूप सकारात्मक चर्चा केली रिक्षा संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत कार्यवाहीचे ही आदेश दिले आहेत.

आम्ही मांडलेले विषय व मागण्या मान्य
-बजाज ऑटो च्या वितरकांवर RTO फी च्या नावाखाली केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या प्रलंबित मागणीस यश, कारवाई करण्याचे RTO पुणे यांना आदेश

-रिक्षा स्क्रॅप करताना PUC, इन्शुरन्स व फिटनेस संपल्यावर आकारण्यात येणारा दंड माफ करणे.
– प्रवासी ट्रान्सपोर्ट लायसेन्स वर GV (मालवाहतूक)असा शेरा येत असल्यामुळे होणारा अडचणींवर दुरुस्ती करण्याचे आदेश.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला

-महिला परमिट च्या रिक्षांना पिंक कलरची सक्ती काढून टाकणे,

-विधवा महिला परमिट साठी आकारण्यात येणारी फी कमी करणे ,

संगणकातील अनेक प्रकारच्या त्रुटी

-मीटर दरवाढ ,

-परवाना हस्तांतराची फि पंचवीस हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपये करणे इत्यादी विषयावर यशस्वी चर्चा झाली.

या बैठकीला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष माननीय श्री बाबा कांबळे, श्री समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे, पुणे शहर ऑटोरिक्षा फेडरेशनचे सरचिटणीस प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिता सावळे व व विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राऊत दादा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.