जगभरात करोना विषाणू आजाराने थैमान घातले आहे. या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीला भेट देणार आहेत. तर त्यानंतर ४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील कंपनीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र काही कारणास्तव ४ डिसेंबरचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लशीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी १ ते २ या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत.

अधिक वाचा  राजकीय पक्षांच्या खर्च नियंत्रणाची सर्व नियमावली ठरली; प्रचारक माणसांचा ‘रेट’ नाश्ता जेवण मंडप होर्डिंगचे हे दर

४ डिसेंबर रोजी १०० देशांचे राजदूत देखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सद्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती राज शिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

mail logo