“नाे पंचनामा,फक्त स्पाॅट पाहणी आणि तात्काळ सहकार्य”

पुणे : महाराष्ट्र राज्यात सर्वदूर पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे.अतिवृष्टीमुळे जवळपास १००% पीक वाहून गेली आहे किंवा सडलेली असताना शेती पंचनामा नाटक न करता तात्काळ बांधावर नुकसान भरपाई द्या.अन्यथा, पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते बांधावर जाऊ देणार नाहीत. असे मत संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी व्यक्त केले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे पुरता हवालदिल हाेऊन प्रचंड अडचणीत आला आहे.शासकीय मदतीशिवाय तो परत उभा राहू शकत नाही .पंचनामे करणे, अहवाल पाठविणे ह्या शासकीय नाटकांची गरज नाही.प्रशासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची ही वेळ नाही.मा.मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अधिकाराखाली जी मदत द्यायची आहे ती तात्काळ ७/१२ बघून शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी व शेतकर्यांना धिर द्यावा.पंचनामे करण्याचे नाटक सरकार करत असेल तर त्याला संभाजी ब्रिगेड चा विरोध आहे. शेती पंचनामा नाटक न करता तात्काळ बांधावर नुकसान भरपाई द्या. नाे पंचनामा,फक्त स्पाॅट पाहणी आणि तात्काळ सहकार्य असे पंचनामे करा अन्यथा पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते बांधावर जाऊ देणार नाहीत.

अधिक वाचा  “वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्याने केलेला नाही,” राजेंद्र पवारांचा अजित पवारांना टोला