कोविड19 च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व पुणे महानगरपालिका सुरुवातीपासून विविध प्रकारे काम करीत आहे. पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोरोनाच्या सुरुवातीपासून विभागीय आयुक्त कार्यालय, स्मार्ट सिटी कार्यालय, पुणे मनपा स्तरावरून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत बैठक घेऊन सर्व बाबींचा आढावा घेत आहेत

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, PMRDA, पुणे मनपा यांच्या सयूंक्त माध्यमातून जम्बो रुग्णालय पुणे शहरात चालू करण्याचा निर्णय करण्यात आला यावेळी पुणे मनपातील भाजपचे सत्ताधारी यांनी निधी देण्याबाबत चालढकल करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे राजकारण पुणेकरांच्या लक्षात येईल अशा भीतीने नंतर सारवासारव केली. या जम्बो रुग्णालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते झाले

अधिक वाचा  सध्या ‘मोबलींचीग’चे रोहित पवार आणि युगेंद्र पवार बळी अन् जीवालाही धोका; पोलीस सुरक्षा द्या: सुळेंची मागणी

राज्याचे उप मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी पुणे शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता बाणेर येथे सीएसआर च्या माध्यमातून मनपाचे कोविड हॉस्पिटल उभे करण्याबाबत लक्ष घालून काम पूर्णत्वास आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे उप मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत कोविड हॉस्पिटलचे उदघाटन कार्यक्रम असतानाही बाणेर येथील स्थानिक नगरसेवकांनी आज पुणे मनपा कोविड हॉस्पिटलचे उदघाटन केले. ज्या ठिकाणी हे हाॅस्पिटल झालेले आहे ते कोथरूड विधानसभा मतदार संघात झालेले आहे. या मतदार संघाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष सुध्दा भाजपचेच आहे. तेही उद्याच्या उद्गाटन प्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. महानगरपालिकेत सत्ता भाजपची आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नगरसेवकानी उद्घाटन करणे चुकीचे आहे.

अधिक वाचा  ‘दुर्गेचा अवतार म्हणून जेव्हा नारी रुप घेते तेव्हा…’, निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे शहरात यापूर्वी राज्यात भाजपची सत्ता असताना व मनपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक प्रकल्पांचे उदघाटन भाजप नेत्यांचे हस्ते करण्यात आले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने कधीही अशा पद्धतीचे राजकारण केले नाही. भाजपचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते तसेच प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत उदघाटन कार्यक्रम असतानाही कार्यक्रम पूर्वी उदघाटन करणे याचा आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक निषेध व्यक्त करतो याचा आम्ही निषेध व्यक्त करतो