कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी कायम स्वरुपी अध्यक्ष आणि ताकदवर नेतृत्वासह पक्षात फेररचना करण्याची आवश्यकता आहे, असं पत्र काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलं होतं. या पत्रावरून वाद थांबत नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी कॉंग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक बोलवण्यात आली होती.  या बैठकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आनंद शर्मांवर पत्र लिहिल्याचा आरोप करत खेद व्यक्त केला. या पत्रावर स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.

हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?

कॉंग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसंच येत्या ४ ते ६ महिन्यांत अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर कॉंग्रेसने सदस्यता अभियानही सुरू करावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे पत्र दुर्दैवी असल्याचं म्हटलं. तर ए. के. अँन्टोनी यांनी हे पत्र क्रूर असल्याचं भाष्य केलं.

अंबिका सोनी यांनी कारवाईची मागणी केली
पत्र लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी CWC च्या बैठकीत अंबिका सोनी यांनी केली. ज्या कुणी शिस्तभंग केला आहे त्याच्यावर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई केली जावी, असं सोनी म्हणाल्या.

अधिक वाचा  निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड

यामुळे बैठक बोलवण्यात आली
CWC ची ही बैठक २ आठवड्यांपूर्वी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्र वादावरून बोलवण्यात आली होती. CWC चे काही सदस्य, यूपीए सरकारमधील नेते आणि मंत्री यांच्यासह किमान २३ नेत्यांनी पक्ष संघटनेच्या विषयावर सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. सशक्त नेतृत्वासह पक्ष चालवण्यासाठी योग्य रणनीतीवर जोर देण्यात आला होता. पक्षाचं नेतृत्व हे सक्रिय आणि प्रत्यक्ष काम करताना दिसून आले पाहिजे, असं पत्रात म्हटलं होतं.