लोकांकडून कर भरला जाईल अशा पातळीवर वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचे दर आणले गेल्याचा सुपरिणाम करविषयक अनुपालनात वाढ करणारा झाला आहे आणि करदात्यांची संख्या दुप्पट म्हणजे १.२४ कोटीवर गेली आहे, असे अर्थ मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा ६५ लाखांच्या आसपास असणारी करदात्यांची संख्या आता १.२४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने, सोमवारी केलेल्या ट्विप्पणीच्या मालिकेतून अर्थ मंत्रालयाने, जीएसटी आल्याने करांचा भार कमी झाल्याचा दावा केला.

पूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट), अबकारी शुल्क, विक्री कर यांचा एकत्रित भार ३१ टक्क्यांपर्यंत जाणारा होता.

अधिक वाचा  प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून मोठा दिलासा, कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा तपास बंद