मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे. लवकरच तो अमेरिकेत तीन महिन्यांच्या उपचारांसाठी जाणार आहे. दरम्यान, शनिवारी तो बहीण प्रिया दत्तसोबत कोकिलाबेन इस्पितळात चेकअपसाठी गेला. संजय त्याचा आगामी सिनेमा सडक २ चं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करून अमेरिकेत जाणार आहे. रिपोर्टनुसार सडक २ सिनेमातील त्याचं डबिंगचं काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण करूनच तो पुढील उपचारांसाठी जाणार आहे. असं म्हटलं जातं की, पुढील आठवड्यापर्यंत डबिंगचं काम पूर्ण होईल.

संजय दत्त यांनी शनिवारी ८ ऑगस्टला लीलावती इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. गळ्यात पाणी जमा झाल्याने त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्याची करोना टेस्टही करण्यात आली. पण ही टेस्ट निगेटिव्ह आली. फिल्मफेअर पोस्टनुसार संजय दत्तच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी झाली होती. त्याच्या फुफ्फुसांत पाणी जमा झालं होतं आणि याचमुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता.

अधिक वाचा  माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत ! अर्थमंत्री सीतारामन यांचे विधान चर्चेत

फुफ्फुसांत साठलेल्या पाण्याची चाचणी केली असता त्यात कर्करोगाचे विषाणू सापडले. सुरुवातीला डॉक्टरांनी व्हायरल इन्फेक्शन, टीबी किंवा कर्करोग यांपैकी एखादा आजार झाला असेल याची भीती होती. बुधवारी आलेल्या रिपोर्टनुसार संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं.

संजय दत्तच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर त्याचे अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘सडक २’, ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘तोरबाज’ अशा सिनेमांचा समावेश आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानीपत सिनेमात त्याला शेवटचे पाहण्यात आले होते.