मुंबई- बॉलिवूड जगतातून अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. संजय दत्तला स्टेज २ चा फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यावर उचपार घेण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होत आहे. संजय एडेनोकार्सिनोमा (Adenocarcinoma) नावाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे.

एडेनोकार्सिनोमा हा कर्करोगाचा एक असा प्रकार आहे ज्यात शरीरात म्यूकर्स तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये पेशी तयार होतात. हा एक फुफ्फुसाचाच कर्करोग आहे. ६१ वर्षीय
संजय दत्त ८ ऑगस्टला इस्पितळात भरती झाला होता. असं म्हटलं जातं की, त्याच्या गळ्यात पाणी साचलं होतं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याला तातडीने लीलावती इस्पितळात भरती करण्यात आलं.गळ्यातलं पाणी काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्यावर उपचारही करण्यात आले. या दरम्यान काही टेस्टही केले. सोमवारी त्याचे रिपोर्ट आले असता त्याला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचं समोर आलं.

अधिक वाचा  सूर्यदेवाने दिला रामलल्लांना आशीर्वाद, असा पार पडला अयोध्येतील ‘सूर्य-तिलक’ सोहळा

डॉक्टर आणि कुटुंबियांनी काहीही सांगितलं नाही

कुटुंबाकडून आणि संजयवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबद्दल काहीही सांगितलं नाही. मात्र सिनेसृष्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त फुफ्फुसांचा कर्करोगाने ग्रस्त आहे. असं म्हटलं जातं की, मुंबईत संजयवर डॉ. जलील पारकर उपचार करत आहेत. १० ऑगस्टला सोमवारी त्याला इस्पितळातून घरी पाठवण्यात आले होते. जेव्हा पारकर यांना संजयच्या आजाराबद्दल विचारले असता रुग्णाच्या रिपोर्टबद्दल गोपनीयता पाळणं महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं.

उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून छोटीशी सुट्टी घेत आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळं उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांमुळं मी लवकरच परत येईन, असा विश्वास आहे. असं ट्विट संजय दत्तनं केलं. रिपोर्टनुसार, ८० च्या दशकात संजय दत्तला पहिल्यांदा फुफ्फुसांचा त्रास जाणवू लागला होता. तेव्हाच त्याच्या फुफ्फुसांनी उत्तर दिलं होतं. यासाठी त्याने अमेरिकेत उपचारही घेतले होते. इथे त्याला ऋचा शर्मा भेटली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि १९८७ मध्ये दोघांनी लग्न केलं.

अधिक वाचा  अनधिकृत बांधकामांची बेकायदा विक्री ? कोंढव्यात मोठया प्रमाणावर ‘भू माफिया’ सक्रिय

संजय दत्तचं कर्करोगाशी जुनं नातं आहे. संजयची पहिली पत्नी ऋचा शर्माचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. तर आई नर्गिस यांचा स्वादुपिंडाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. असंही म्हटलं जातं की, संजयला अमेरिकेत जाण्यास परवानगी मिळाली नाही तर तो उपचारांसाठी सिंगापूरला जाऊ शकतो.