फ्रान्सकडून झेपावलेली राफेल ही घातक लढाऊ विमाने आज भारतीय भूमीवर उतरणार आहेत. भारतीय हवाई दलाचा दरारा आशियात यापूर्वीच आहे. आता राफेल भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर हवाईदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. हे विमान जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील दुर्गम डोंगराळ भागात भारताला सर्व प्रकारच्या हवामानात सेवा देणार आहे.
चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर या घातक राफेल विमानांची तैनाती केल्याने भारताचे हवाई संरक्षण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे, यात शंका नाही. भारतीय राफेलच्या समोर चीनचे चेंगदू जे -२० आणि पाकिस्तानचे जेएफ -१७ ही लढाऊ विमाने आहेत. मात्र, ही दोन्ही प्रकारची विमाने राफेलपेक्षा शक्तीने थोडेसे कमीच दिसत आहेत.
एकाच वेळी अनेक कामे करतो राफेल
राफेल विमान आणि जे-२० ही दोन्ही विमाने सिंगल-सीटर, जुळी इंजिन असलेली विमान आहेत. चिनी जे -२० चे काम मुख्यत: स्टील्थ फायटरची आहे, तर राफेल अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी चीन जे -२० चा वापर करतो. पाळत ठेवण्याव्यतिरिक्त, राफेल देखील आक्रमण करणे आणि हल्ल्यांमध्ये सहज वापरले जाऊ शकतात. राफेलला भारताच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे. या मुळे राफेल चिनी जे -२० पेक्षा वरचढ आहे.
J-20 पेक्षा अधिक अंतर कापू शकतो राफेल
चीनचे J-20 या लढाऊ विमानाच्या तुलनेत भारताचे राफेल भारी आहे.J-20 जास्तीत जास्त २४,५०० किलो (विमानासह) वजन पेलू शकते. त्याच वेळी, भारताचे राफेल हे ३४ हजार किलोपासून ते ३७ हजार किलो वजन पेलू शकते. राफेलची रेंज ३,७०० किमी आहे. ही रेंज J-20 पेक्षा जास्त आहे. J -20 ची मूळ रेंज १,२०० किमी आहे. ती २,७०० किमी पर्यंत वाढविली जाऊ शकते. दोन्ही लढाऊ विमाने आपल्याबरोबर चार क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. दोघांची शीर्ष गती देखील जवळजवळ समान आहे (२१००-२१३० किमी ताशी)
पर्वतीय प्रदेशात J-20 ला भारी पडणार राफेल
J-20 ची लांबी २०.३. मीटर ते २०.५ मीटर पर्यंत आहे. तसेच या विमानाची उंची ४.४५ मीटर आणि पंख १२.८८ ते १३.५० मीटर दरम्यान आहेत. तर राफेलची लांबी १५.३० मीटर आणि उंची ५.३० मीटर इतकी आहे. राफेलचे पंख फक्त १०.९० मीटर इतके उंच आहेत. यामुळे डोंगराळ भागात उड्डाण करण्यासाठी हे एक उपयुक्त असे विमान आहे. हे विमान तुलनेने लहान असल्याने ते कुशलतेने उडवता येते.
दोन्ही जेट्समध्ये पाळत ठेवण्याची उत्तम व्यवस्था
चीनच्या J-20 मध्ये अंतर्गत कॅनॉन बसवण्यात आला आहे. हे एईएसए रडारसह सुसज्ज आहे. ते ट्रॅक सेन्सरने सुसज्ज आहे. चीनचा असा दावा आहे की त्यांच्याकडे एक निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक-ऑप्टिकल शोध प्रणाली देखील आहे. ही प्रणाली पायलटला ३६० डिग्रीची रेंज देते. या लष्करी विमानातून चिनी सैन्य उपग्रह आणि अनेक ड्रोनच्या डेटा जाणून घेऊ शकतो. चीनने त्यामध्ये पीएल- १५ मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
या क्षेपणास्त्राच्या रडारची रेंज २०० किमीपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत राफेलकडे कितीतरी अधिक क्षमता आहे. म्हणजेच, लक्ष्य असलेले विमान न पाहता ते उडवले जाऊ शकते. राफेलकडे एक सक्रिय रडार सीकर आहे. या द्वारे जो जेटला कोणत्याही हवामानात ऑपरेट केले जाऊ शकते. स्कॅल्प मिसाईल किंवा स्ट्रॉम शॅडो यांसारखी क्षेपणास्त्रे कोणतीही बंकर सहज नष्ट करू शकतात. त्याची रेंज सुमारे ५६० किमी आहे. राफेलकडे अण्वस्त्रे वाहून नेण्याची देखील क्षमता आहे.
पाकिस्तानी JF-17 ला चीनने दिले बळ
पाकिस्तान ने चीनच्या सहाय्याने मिलर हे लडाऊ विमान विकसित केले. हे मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. हे विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. चीनमध्ये या विमानाला नव्या गोष्टींची जोड दिल्यानंतर ते अधिक सक्षम झाले. यात PF-15 ही क्षेपणास्त्रांचा वापर होऊ लागला आहे. यात इन्फ्रारेड सिस्टमदेखील बसवण्यात आली आहे.
या मिसाईलची रेंज ३०० किलोमीटर इतकी आहे. ही क्षेपणास्त्रे अत्याधुनिक क्षेपणास्त्रांपैकी समजली जातात. यात PF -15 क्षेपणास्त्रे जोडली गेल्यानंतर अमेरिकेनेही विरोध केला होता. राफेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची रेंज तुलनेने कमी आहे.