केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे. याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार या कायद्याला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा अधिकार या कायद्याला व्यापक रुप देण्यात आलं आहे. आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणण्यात येणार आहे. तसंच आता कला, संगीत, शिल्प, खेळ, योग, समाज सेवा या विषयांना अभ्रासक्रमातच सामिल करण्यात येणार आहे. तसंच त्यांना को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून म्हटलं जाणार नाही, असा बदल नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि आवश्यक क्षमतांना विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसंच यात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन आणि उच्च दर्जाचे शिक्षण यावर जोर देण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणाच्या जागतिक स्तरावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. याव्यतिरिक्त पदवीपूर्वी शिक्षणाचीही रचना बदलण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना पर्यायदेखील देण्यात येणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची, ‘राष्ट्रीय शिक्षण आयोगा’ची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.

अधिक वाचा  लोकसभा दुसरा टप्पा निवडणुक अधिसूचनाही निघाली तरी महायुतीत जागावाटपाचा येथे तिढा? अजुनही बैठका

शिक्षकांच्या प्रशिक्षणात व्यापक सुधारणा होण्यासाठी विद्यापीठ किंवा महाविद्यालयांच्या पातळीवर शिक्षक प्रशिक्षण आणि सर्व शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ हे भारतीय नागरिक, परंपरा, संस्कृती आणि भाषांची विवधता लक्षात घेऊन वेगाने बदलणार्‍या समाजाच्या गरजांवर आधारित आहे.

याव्यतिरिक्त नव्या बदलांद्वारे उच्च गुणवत्तेचं शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. तसंच जागतिक व्यासपीठावर आर्थिक विकास, सामाजिक विकास, समता आणि पर्यावरणाची काळजी, वैज्ञानिक प्रगती आणि सांस्कृतिक संरक्षणाच्या नेतृत्वास मदत करेल याचाही विचार करण्यात आला आहे.

या धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शालेय शिक्षण, उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदेशीर शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण हे त्याच्या कार्यक्षेत्रात आणले गेले आहेत.