भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्या आता 14 लाख 83 हजार 156 झाली आहे. गेल्या 24 तासांत 47 हजार 704 नवीन रुग्ण आढळून आले. तर, एकाच दिवसात 654 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रीय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 33 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणदे आतापर्यंत 9 लाख 52 हजार 743 लोकं निरोगी होऊन घरी परतले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 64.23% झाला आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एक लाख 40 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. या पाच राज्यांसह जगभरातील एकूण देशांच्या तुलेनत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका आणि ब्राझील यांचा क्रमांक लागतो.
राज्यांची परिस्थिती

अधिक वाचा  मलिकही सत्ताधारी? अजित पवारगटाची ही भूमिका संभ्रम माञ वाढला; अजित पवारांनीही केलं रिट्विट

महाराष्ट्रात 24 तासांत 7924 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात 24 तासात 7924 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 83 हजार 723 झाली आहेत. तर, आतापर्यंत 13 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकाच दिवसात 8,706 रुग्ण निरोगीही झाले आहेत. यासह राज्यातील एकूण निरोगी रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 944 झाली आहे.

पॉझिटिव्हिटी रेट 9.03%
आज देशाचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा सुधारला आहे. तर, पॉझिटिव्हिटी रेट 9.03% झाला आहे. दिल्लीत सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. दिल्लीचा रिकव्हरी रेट 86.04% आहेत. येथे 100मधून 86 रुग्ण बरे होतात. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

अधिक वाचा  संविधान बचाव यात्रेचे पनवेल शहरामध्ये भव्यदिव्य स्वागत

जगभरात भारत तिसऱ्या स्थानावर
जगभरातील एकूण रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिका आणि ब्राझील सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशांपैकी आहेत. इतर देशांच्या मानाने भारताचा मृत्यूदर कमी आहेत. भारतापेक्षा अमेरिका (4,432,549), ब्राझीलमध्ये (2,443,480) सर्वात जास्त रुग्ण आहेत.