कोरोनावरच्या औषधावर भारतासह जगभर संशोधन सुरु आहे. जगात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेका(Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine) यांनी तयार केलेल्या औषधाची. या औषधाच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली असून त्याच्या पहिल्या फेरीतले निष्कर्ष उत्साहवर्धक आल्याने सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता याच औषधाची मानवी चाचणी भारताती घेतली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या औषधाची शेवटच्या फेरीतली चाचणी (final phase of human trials) भारत होणार असल्याने त्याचा फायदा देशाला होणार आहे.

अशा प्रकारची चाचणी घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती DBTच्या सचिव रेणू स्वरुप यांनी दिली आहे. भारतात पाच ठिकाणी ही लस दिली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही स्वरुप यांनी दिली. या औषधाचं उत्पदन करण्याची जबाबदरी पुण्याच्या ‘सीरम’ Serum Institute of India- SII या जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मात्या कंपनीकडे देण्यात आली आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कामगिरी! एनडीएच्या प्रचारासाठी प्रचाराला गेले अन् थेट दोन आमदारच पक्षात घेऊन आले!

हा प्रयोग यशस्वी ठरला तर भारतात लवकरात लवकर औषध कसं पोहोचेल याची सरकार काळजी घेईल असंही सांगण्यात आलं आहे. जगप्रसिद्ध लॅन्सेट मासिकात पहिल्या चाचणीबाबत एक अहवाल जाहीर झाला आहे. त्यात ते निष्कर्ष देण्यात आले आहेत.

या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. अँटिबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची वाढ झाल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होते. हे परिमाण सकारात्मक असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  नोरा फतेहीने केली इंडस्ट्रीची पोलखोल! बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधत केला गौप्यस्फोट

ऑक्सफर्डचे प्रमुख प्रोफेसर एंड्रयू पोलार्ड यांनी सांगितलं, क्लिनिकल ट्रायलचे खूप सकारात्मक परिणाम मिळत आहेत. आता आम्ही वयस्कर व्यक्तींवर याचा काय परिणाम होतो ते तपासणार आहोत.

जगभरात 140 पेक्षा जास्त लसींवर काम सुरू आहे. त्यापैकी 13 लसी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत. तर इतर लसी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.