श्रीमती बयाबाई बापूराव शेळके यांच्या स्मृती दिनानिमित्त काळाची गरज ओळखून तसेच कारगिल दिनाचे औचित्य साधून शेळके परिवार पुणे यांच्याकडून रक्तदान शिबीर अश्वमेध हॉल कर्वे रोड पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी ६६ रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले . प्रत्येक रक्तदात्यास N ९५ मास्क आणि SANITIZER देण्यात आले. ह्या कार्यक्रमास मेधाताई कुलकर्णी, डॉकटर संदीप बुटाला यांनी मोलाचे सल्ले दिले.

यावेळी प्रशांत पवार (पुणे पोलीस), काजळे सर जयसिंगराव भोसले, प्रकाश तात्या बालवडकर, अनिल घोलप , अजय मारणे, उमेश कंधारे, प्रशांत हरसुळे,संदीप दुर्गे, वैभव जमदाडे, संजय सकपाळ, अमोल डांगे, संदीप मोकाटे, शुभांगी जोशी, संतोष लोंढे, प्रकाश वारे, राजेश कंधारे, दीपक थरकुडे, युवराज शिंगाडे, सुरेश अनिवासे, बाळासाहेब कोळापटे, विठ्ठल जंगले आदींनी उपस्थिती दर्शवली. या शिबिरासाठी आय एस आय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

अधिक वाचा  छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन मोरया मित्र मंडळाचा वेगळा स्तुत्य उपक्रम