कोल्हापूरः भाजप नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सुळे आणि धनंयज महाडिक भेटीनं कोल्हापुर जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुकवर त्यांच्या भेटीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळं या भेटीमागचं कारण नक्की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. साखर कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जातं आहे. धनंयज महाडिक भाजपच्या राज्यातील साखर कारखाना विभागाचे प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. धनंजय महाडिक यांनी अचानक सुप्रिया सुळींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग आला होता. मात्र, मडाडिक यांनीचं ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी असल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अधिक वाचा  केंद्रीय ‘सामाजिक न्यायमंत्री’ आठवले न्यायाच्या प्रतीक्षेत; ‘शिर्डी’चा प्रभावी आग्रह की ‘आरपीआय’चे पेल्यातीलच वादळ?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह धनंजय महाडिक यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील साखर कारखाने व उद्योगांसदर्भात चर्चा करण्यात आली होती.

महाडिक यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादीने लोकसभेचे तिकिट दिले होते. या निवडणूकीत त्यांचा विजय झाला. मात्र, २०१९च्या निवडणूकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात त्यांना पराभव स्विकारावा लागला. नंतर लगेचच सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.