राज्यातला पहिला कोरोना रुग्ण पुण्यात सापडला होता. आता पुन्हा एकदा पुणे शहर आणि जिल्हा राज्यातच नाही तर देशभरातला चिंताजनक हॉटस्पॉट ठरला आहे. Unlock नंतर पुण्यात Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. एक आठवड्याच्या कडक लॉकडाऊननंतही रुग्णवाढ कमी झालेली नाही. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्रस्त आहे. मात्र पुणे शहरी भागात हे चित्र असले तरी गावा-खेड्यांमध्ये वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुण्यातील तब्बल 13 तालुक्यांमधील परिस्थिती पुणेकरांना आशा देणारी आहे.

पुणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांनी कोरोनाला पकडा मिशन सुरू केले आहे. या उपक्रमामुळे 1405 गावांपैकी तब्बल 1100 गावांमुळे गेल्या 4 महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही आहे. एकीकडे पुणे शहर भागात मार्चमध्ये कोरोनाचे 39 हजार रुग्ण सापडले, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 हजार. मात्र या विरुद्ध 40 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे ग्रामीण भागातल केवळ 2300 रुग्ण सापडले. पुणे ग्रामीणमधला मृत्यूदर सर्वात कमी आहे. आतापर्यंत केवळ 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  अरुणाचल प्रदेशातील टॅक्सीवाल्याने नागपूरकरांकडून पैसे घेतले नाही, कारण…नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

काय आहे व्हायरसला पकडा मिशन?
पुणे जिल्हा परिषदेचे संचालक आयुष प्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे ग्रामीण भागात व्हायरसला पकडा या मिशनला सुरुवात झाली. पुणे शहरात आणि मुंबईत गेलेल्या आणि येथून आलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून कागदोपत्री लिहून घेण्यात आले की, आम्ही गावी परतल्यानंतर फिरणार नाही, बाजारात जाणार नाही, क्वारंटाइनचे नियम पाळू. त्याचबरोबर संपूर्ण गावासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले. मुख्य म्हणजे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, यासाठी एक टीम तैनात करण्यात आली. त्याचबरोबर लोकांना 100 ते 500 पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ लागला. अशा प्रकारे ही 1100 गावं कोरोनामुक्त झाली. खरतर पुणे शहरानं मुंबईकडून नाही तर पुणे ग्रामीण भागातूनच धडा घ्यावा.

अधिक वाचा  अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, ‘मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..’

पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढताच
22 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 42466 झाली आहे. 24 तासांतच 1751 रुग्णांची वाढ झाली आहे. 22 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात 24 तासांत 39 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. 609 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 94 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

मुंबई आणि त्यानंतर कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठाणे जिल्ह्यापेक्षाही पुण्याची रुग्णवाढ जास्त आहे. सध्या सर्वाधित अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यातच आहेत. आठवडाभर कडक लॉकडाऊन असूनही सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यापैकी शहरात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 16269 आहे. आतापर्यंत एकूण 1068 कोरोना बळी शहरात गेले आहेत.