महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा उद्रेक व्हायच्या मार्गावर आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10576 कोरोनारुग्णांचं निदान झालं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा हा पहिलाच दिवस आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 337607 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,36,980 रुग्ण आहेत.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं.गेल्या 24 तासांत 10576 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 280 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5552 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं.

अधिक वाचा  माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वपक्षियांचा टोला?

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा इतर शहरांमधला संसर्ग वाढला. आता सर्वाधिक रुग्णवाढ पुणे जिल्ह्यात होते आहे. पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,87,769 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

21 जुलै पर्यंतची आकडेवारी
अॅक्टिव्ह रुग्ण – 1,36,980
24 तासांतली वाढ – 10576
बरे झालेले रुग्ण – 1,87,769
एकूण मृत्यू -12,556
एकूण रुग्ण – 3,37,607

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नतेचा मोठा निर्णय; ११० महाविद्यालये रडारवर एप्रिल अखेर यादीच प्रसिद्ध

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्याला पुण्याने या बाबतीत मागे टाकलं आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिकचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार
पुणे 39353
ठाणे 36180
मुंबई 23393
रायगड 5671
पालघर 5339
या पाच जिल्ह्यांनंतर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा क्रमाक लागतो.