शानदार फीचर्स असलेला सॅमसंगचा प्रीमियम फोन Galaxy Note 10 Lite खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने कपात केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत चार हजार रुपयांची कपात केल्याने या फोनची (6जीबी रॅम) किंमत 41,999 रुपयांवरुन कमी होऊन 37,999 रुपये झाली आहे. तर, 8जीबी रॅम व्हेरिअंटची किंमतही कमी झाली असून हा फोन आता 43,999 रुपयांऐवजी 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

5 हजार रुपये कॅशबॅक ऑफर :-
किंमतीत झालेल्या कपातीव्यतिरिक्त कंपनी या फोनवर आकर्षक ऑफरही देत आहे. सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांना 5 हजार रुपये कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक ऑफरमुळे 6जीबी रॅम व्हेरिअंट 32,999 रुपये आणि 8जीबी रॅम मॉडेलसाठी 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, सिटी बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नसलेल्यांनाही 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक कंपनीकडून दिली जात आहे. तसेच हा फोन कंपनी 9 महिन्यांच्या आकर्षक नो-कॉस्ट इएमआयच्या पर्यायासह देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे.

अधिक वाचा  वडिलांनी माझ्यासाठी ती एक गोष्ट आजवर केली नाही; अमित ठाकरेंकडून खंत व्यक्त

काय आहे नोट 10 लाइटची खासियत?:-
‘नोट 10’ या स्मार्टफोनप्रमाणे नोट 10 लाइटमध्येही कंपनीने S Pen दिले आहे. यामुळे हा फोन अन्य फोनपेक्षा जरा वेगळा ठरतो. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल-HD+ (1080×2400 पिक्सल) सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Exynos 9810 प्रोसेसर आणि 128 जीबीपर्यंतच्या स्टोरेजसह येतो. तसेच फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, तर सिंगल फ्रंट कॅमेरा आहे.

ट्रिपल रिअर कॅमेऱ्यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,500mAh क्षमतेची बॅटरी आहे.