पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुणे शहरात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाउन केल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 1141 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात 10 दिवसांच्या लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या कालावधीतील पहिला दिवस शिस्तबद्ध गेला असला तरी पुणे आणि परिसरात याच दिवशी 1141 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1141 पैकी पुण्यात 690 तर पिंपरी चिंचवडमध्ये 521 रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात 171 तर छावणी परिसरात 109 रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर 728 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत एकूण 18824 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

अधिक वाचा  हा एनडीएचा विश्वासक चेहरा ‘……राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; ही दिली आश्वासनं

दरम्यान, पुण्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाउनमुळे पहिले पाच दिवस फक्त दूध घरपोचसेवा आणि मेडिकल्स वगळता सर्व सेवा बंद राहतील. 19 जुलैपासून भाजीपाला आणि दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.