भारतीय संघ क्रिकेट जगतामध्ये बलाढ्य समजला जातो. आतापर्यंत भारताने तीन विश्वचषकही जिंकले आहेत.

भारताने बरेच कर्णधार पाहिले. कपिल देव यांनी भारताला पहिला विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने तर भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले. पण वनडे क्रिकेटमध्ये भारताचे सर्वात जास्त नेतृत्व करण्याची संधी कोणाला मिळाली, पाहा…
राहुल द्रविड
भारताचे नेतृत्व द वॉल राहुल द्रविडनेही सांभाळले होते. द्रविडने आपल्या कारकिर्दीत ७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.
विराट कोहली
सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच विजय मिळवले आहेत. पण कोहलीने आतापर्यंत ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
सौरव गांगुली
सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक कर्णधार असल्याचे म्हटले जायचे. गांगुलीने भारताचा संघ घडवला होता. त्याचबरोबर गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००३ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. गांगुलीने आतापर्यंत १४६ वनडे सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते.
मोहम्मद अझरुद्दीन
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने बराच काळ भारताचे नेतृत्व केले होते. पण मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. अझरने १७४ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले आहे.
महेंद्रसिंग धोनी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते. धोनीने भारताला दोन विश्वचषक, एक चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकवून दिली होती. धोनीने आतापर्यंत सर्वाधिक वेळा वनडेमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. धोनीने आतापर्यंत २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते.
धोनी ठरला सर्वात यशस्वी कर्णधार
आतापर्यंत भारताने बरेच कर्णधार पाहिले. या सर्वांमध्ये धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले. कपिल देव यांनी एक विश्वचषक देशाला जिंकवून दिला.

अधिक वाचा  निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड